मुंबई- राज्यात धोकादायक इमारत कोसळण्याच्या घटना नवीन नाहीत. महाडमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना आता नागपाड्यातील सुलतानी-मिश्रा या इमारतीचा काही भाग आज दुपारी एकच्या सुमारास कोसळला. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा - नागपाड्यात इमारतीचा काही भाग कोसळला, २ जणांचा मृत्यू
मुंबई - सुशांतसिंह राजपूत याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचे ड्रग्सडीलरसह संबंध असल्याचे व्हाट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर या संदर्भात ईडीकडून रिकव्हर केलेले व्हाट्सअॅप चॅट हे सीबीआय व नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरोला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार या संबंधात तपास सुरू करण्यात आला असून नार्कोटिक्स नियंत्रण खात्याकडून गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या संदर्भात तपास करण्यासाठी दिल्लीतील नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरोचे दोन पथक रवाना झाली होती. त्यातील एक पथक गोव्यात गौरव आर्या याचा शोध घेण्यासाठी दाखल झाले असून दुसरे पथक गुरुवारी (27 ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले आहे.
सविस्तर वाचा - सुशांत प्रकरण : दिल्लीतून नार्कोटिक्स नियंत्रण पथक मुंबईत दाखल
- मुंबई- राज्यातील कोरोना रुग्ण संख्येने सात लाखाचा टप्पा पार केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी १४ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज १४ हजार ७१८ कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात दिवसभरात ९१३६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७२.४६ टक्के झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७८ हजार २३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज ३५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सविस्तर वाचा- राज्यात १४ हजार ७१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ३५५ मृत्यू
- हैदराबाद- 'ई टीव्ही'ला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रसंगी रामोजी फिल्म सिटी येथे 'ई टीव्ही'चा रौप्यमहोत्सव मोठ्या थाटात पार पडला. यावेळी रामोजी समुहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचे नातू सुजय यांनी केक कापून आनंद साजरा केला. या कार्यक्रमाला रामोजी राव यांच्यासह त्यांचे कुटुंब व कर्मचारी उपस्थित होते.
सविस्तर वाचा-'ई टीव्ही'ला २५ वर्षे पूर्ण; रामोजी फिल्म सिटीत थाटात पार पडला रौप्यमहोत्सवी सोहळा
- नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'आत्मनिर्भर भारत डिफेन्स इंडस्ट्री आऊटरीच वेबिनार'ला संबोधित केले. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतवर जोर दिला. आपला उद्देश भारतीय संरक्षण क्षेत्रातील उत्पादन वाढवणे आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा भारताकडे संरक्षण उत्पादन करण्याची क्षमता होती. मात्र, दुर्देवाने त्याकडे लक्ष देण्यात आले नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वेबिनारला संबोधित करताना म्हणाले.
सविस्तर वाचा -'संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेमुळे भारताची जागतिक स्तरावर मान उंचावेल'
- नवी दिल्ली - कोरोना महामारीत राज्यांचा महसूल घटला असताना त्यांना देण्यात येणाऱ्या जीएसटी मोबदलाबाबत जीएसटी परिषदेत आज चर्चा करण्यात आली आहे. जीएसटी परिषेदेने राज्यांना जीएसटी मोबदला देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. राज्यांना बाजारातून कर्ज घेण्याचे अथवा आरबीआयकडून कर्ज घेण्याचे दोन पर्याय जीएसटी परिषदेच्या अध्यक्षा निर्मला सीताराम यांनी सूचविले आहेत.
सविस्तर वाचा - जीएसटी मोबदला देणे शक्य नाही; राज्यांपुढे आरबीआयसह बाजारातून कर्ज घेण्याचा सरकारचा प्रस्ताव
- मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीएसटी प्रकरणी थेट केंद्र सरकारला दोषी ठरवले होते. यानंतर आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वस्तू व सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जूलै २०२० पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी येणे असल्याची माहिती दिली. यासह ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात १ लाख कोटींवर जाईल, अशी भीती अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ४१व्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेत व्यक्त केली.
सविस्तर वाचा - राज्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राने कर्ज काढावे; जीएसटी परिषदेत उपमुख्यमंत्र्यांची मागणी
- नवी दिल्ली – वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून सुरू झाली आहे. बैठकीत महसूल कमी होत असताना राज्य सरकारला बाजारातून कर्ज घेण्याच्या कायदेशीर मुद्द्यावर चर्चा होणार आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी थकीत जीएसटी मोबदलावरून केंद्र सरकारवर नुकतेच निशाणा साधला आहे. त्यामुळे जीएसटी परिषदेची ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा - जीएसटी परिषदेची ४१ वी बैठक सुरू; थकीत मोबदल्यावरून वादळी चर्चा होण्याची शक्यता
- हैदराबाद - कोरोना विषाणूनं गेल्या सहा-सात महिन्यात अवघ्या जगात थैमान घातले आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 कोटी 43 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत जगभरामध्ये तब्बल 2 लाख 89 हजार 585 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 7 हजार 167 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिका, ब्राझिल, भारत, रशिया आणि दक्षिण अफ्रिका या देशांना बसला आहे.
सविस्तर वाचा - जगभरात 2 कोटी 43 लाख 32 हजार 280 जणांना संसर्ग; तर 8 लाख 29 हजार 666 जणांचा बळी
- मुंबई - केंद्रीय कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेतील लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आल्यावर हार्बर मार्गावर प्रवासी भार वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी हार्बर मार्गावर उद्यापासून (दि. 28 ऑगस्ट) 2 अतिरिक्त लोकल सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वाचा - मुंबईची लोकल रुळावर येणार; मध्य रेल्वेकडून 'ही' घोषणा