ETV Bharat / bharat

Top १० @ १ PM : दुपारी एकच्या ठळक बातम्या! - दुपारी एकच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top १० @ १ PM : दुपारी एकच्या ठळक बातम्या!

author img

By

Published : May 24, 2020, 1:22 PM IST

नांदेड - बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथे शनिवारी रात्री दीड वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा - दुहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले; बाल तपस्वी रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा गळा दाबून खून

अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पिंपरी गावातील एका शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या मजुराला त्याच्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन केले होते. शुक्रवारी रात्री त्याने एका झाडाला साडी बांधून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर अंगारे (वय 32) असे आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे.

सविस्तर वाचा - धक्कादायक : विलगीकरणात ठेवलेल्या मजुराची गळफास घेऊन आत्महत्या.....

निलंगा (लातूर) – तू मुंबईवरून आला आहेस गावात का फिरतोस, याचा राग मनात धरून एकाने शेजारी गावातील नातेवाईकांना बोलावून मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेल्या दोघांवर चाकूने वार हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

सविस्तर वाचा - बाहेर का फिरतोस, म्हटल्याच्या रागातून अँटी कोरोना फोर्सच्या दोन तरुणांची हत्या, निलंग्यातील घटना

लातूर - पाणीपुरवठा योजनेकडे झालेले दुर्लक्ष आणि ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा दोन मजुरांच्या जीवावर बेतला आहे. पाणीटंचाईच्या झळा भासू लागल्याने 72 वर्ष जुन्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांचा ऑक्सिजन अभावी गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्घटना जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे घडली आहे. मारुती पवार व परमेश्वर केंद्रे अशी गुदमरुन मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत.

सविस्तर वाचा - पाणीटंचाईच्या झळा; गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन मजुरांचा गुदमरुन मृत्यू

पुणे - दोन महिन्यांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. देशभरातील प्राणिसंग्रहालय या काळात बंद आहेत. या काळात प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी घेतली जात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, याची माहिती उपसंचालक डॉ. निघोटे यांनी दिली आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने प्राणिसंग्रहालयाचे उपसंचालक डॉ. निघोटे यांच्याशी साधलेला संवाद खास वाचकांसाठी. . . .

सविस्तर वाचा - कोरोना इफेक्ट; प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या टिपल्या जातात हालचाली, घेतली जाते 'अशी' खबरदारी

नवी दिल्ली - तुम्ही घरून काम करत असाल अथवा स्मार्टफोनचा अधिक वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाच्या संकटात सायबर हल्ल्याचे नवे संकट निर्माण झाले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढून 37 टक्के झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

सविस्तर वाचा - सावधान! सायबर हल्ल्याच्या प्रमाणात तीन महिन्यातच 37 टक्क्यांची वाढ

सॅप्पोरो - रुग्णालयात यावे न लागता रुग्ण असेल, त्या ठिकाणी जलद गतीने आणि मोठ्या प्रमाणात रोगांसंबंधीच्या चाचण्या करण्यासाठी जपानमधील संशोधकांनी 'पोर्टेबल अ‌‍ॅनालायझर' विकसित केला आहे. याच्याद्वारे त्यांनी रक्ताच्या सीरममधील अँटी-एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस अँटीबॉडी (प्रतिजैविके) 20 मिनिटांत शोधण्यात यश मिळवले होते.

सविस्तर वाचा - जपानी संशोधकांनी विकसित केले 'पोर्टेबल अॅनालायझर'

इस्लामाबाद - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर तौफिक उमरला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच तौफिकने स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले आहे. या संदर्भातील वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे.

सविस्तर वाचा - पाकिस्तानच्या माजी सलामीवीराला कोरोनाची लागण

मुंबई - केंद्र सरकारने देशातील मैदाने व स्पोर्टस कॉम्पलेक्स खेळाडूंना सरावासाठी सुरु करण्याची परवानगी दिली आहे. पण, यासाठी खेळाडूंना काही अटी व नियम घालून दिले आहे. याशिवाय क्रिकेटपटूंसाठी आयसीसीने व बीसीसीआयनेही काही दिशानिर्देश जारी केले आहे. याचे पालन करुन शार्दुल ठाकूरने आऊटडोर ट्रेनिंग सुरू केली आहे. लॉकडाऊननंतर आऊटडोअर ट्रेनिंग करणारा शार्दुल भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला.

सविस्तर वाचा - सरावाला सुरुवात : शार्दुल ठरला आऊटडोअर ट्रेनिंग करणारा भारताचा पहिला क्रिकेटपटू

मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. भूमीच्या मते, सध्याच्या काळात प्रेक्षकांसाठी नायिकेची भूमिका बदलली आहे. सध्या प्रेक्षक प्रत्येक भूमिका आणि कथा स्वतःशी रिलेट करत असतात. त्यात ते स्वतःला पाहात असतात.

सविस्तर वाचा - प्रेक्षकांसाठी नायिकेची व्याख्या बदलली, भूमी पेडणेकरने सांगितले अनुभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.