नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 6 हजार 750 झाला आहे. यात 61 हजार 149 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 42 हजार 297 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 3 हजार 303 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/highest-ever-spike-of-5611-number-covid19-cases-and-140-deaths-in-the-last-24-hours-in-india/mh20200520103433280
ओडिशा - अम्फानच्या वादळामुळे धोकादायक वारे वाहू लागले आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशामध्ये आतापर्यंत 1704 निवारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून 1 लाख 19 हजार 75 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच ओडिशामध्ये भूसख्खलन होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मुंबई - ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱयावर सूपर सायक्लॉन अम्फान वादळाचा धोका लक्षात घेऊन २१ मे पर्यंत ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांनी याबाबत माहिती दिली.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये प्रवासी मजुरांसाठी काँग्रसने १ हजार बस सोडण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणी काँग्रेसकडून फसवणूक होत असल्याचा आरोप उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय लल्लू यांच्या अटकेनंतर काँग्रेसकडून भाजपला अल्टिमेटम देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंत आम्ही बसेससह आग्रा सीमेवर थांबू, असे काँग्रेसने म्हटले आहे
उत्तर प्रदेश - इटावामध्ये पीक-अप आणि ट्रकमध्ये टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 6 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर 1 जण गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
नवी दिल्ली - येत्या १ जूनपासून २०० बिगरवातानुकूलित स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केली. सध्या देशात 200 श्रमिक रेल्वे धावत आहेत. येत्या दिवसांमध्ये हा आकडा वाढून आणखी रेल्वे धावतील.
गडचिरोली - महिला नक्षली नेता सृजनाक्का ही 2 मे ला झालेल्या चकमकी दरम्यान पोलिसांकडून मारली गेली. तिच्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी एक आठड्यापूर्वी २० मे ला गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा केली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी आज जिल्ह्यात उत्पात सुरू केला आहे. सकाळी धानोरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सावरगाव जवळ वाळू वाहतूक करणारी चार वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिली.
केरळ - भारतीय फुटबॉल संघाचा बचावपटू संदेश झिंगन इंडियन सुपर लीग (आयएसएल) संघ केरला ब्लास्टर्सपासून वेगळा होऊ शकतो. एका वृत्तानुसार, झिंगन आयएसएलच्या पहिल्या आवृत्तीपासून केरला ब्लास्टर्सबरोबर खेळत आहे. झिंगन हा या संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारा फुटबॉलपटू आहे.
मुंबई - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या फॅन्सना एक गोड बातमी दिली आहे. कुणाल बेनोडेकर या व्यवसायिकाशी 2 फेब्रुवारी रोजी आपला साखरपुडा पार पडला असून लवकरच आपण त्याच्याशी लग्न करणार असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे.
सीटल - मायक्रोसॉफ्टने नवा शक्तिशाली सुपरकॉम्प्युटर तयार केला आहे. त्यासाठी कंपनीने कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेमधील (एआय) ओपनएआय या स्टार्टअपसाठी भागीदारी केली होती. हा सुपरकॉम्प्युटर अझुरे या ठिकाणी एआयच्या मोठ्या मॉडेलला प्रशिक्षीत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मायक्रसॉफ्टने डेव्हलपर्सच्या परिषदेत नव्या सुपरकॉम्प्युटरची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीने ओपएन आयमध्ये २०१९ ला १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.