ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या...

राज्यसह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा, एका क्लिकवर...

top-10-news-at-11-pm
Top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या...
author img

By

Published : Jul 26, 2020, 11:13 AM IST

Updated : Jul 26, 2020, 11:26 PM IST

  • मुंबई : राज्यात कोरोनाच्या संसर्गाचा वेग अद्यापही वाढता आहे. आज (रविवार) कोरोनाच्या ९ हजार ४३१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. तसेच, आज ६ हजार ४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख १३ हजार २३८ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा : राज्यात ९ हजार ४३१ नव्या कोरोनाग्रस्तांची नोेंद; २६७ मृत्यू, तर ६ हजार रुग्णांना डिस्चार्ज..

  • भंडारा - जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून चार लोकांवर अमानुष मारहाण करून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वेळेत पोलीस पोहोचल्यामुळे एक मोठी घटना टळली आहे. या चारही लोकांना उपचारासाठी तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असून पोलिसांनी काही आरोपींना अटक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

सविस्तर वाचा : भंडारा : जादूटोणा केल्याच्या संशयावरुन 4 लोकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

  • जळगाव - मलकापूर येथून निघालेला एक कंटेनरचालक मद्याच्या नशेत तर्र झाला. यानंतर त्याने जामनेर तालुक्यातील नेरी ते जळगाव अशा २३ किलोमीटरच्या प्रवासात ३० पेक्षा अधिक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा थरार आज (रविवार) दुपारी जळगावात घडला आहे. जळगाव रेल्वेस्थानकाजवळ रस्ता संपल्यामुळे मद्यधुंद चालकाने कंटेनर उभा केला. यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (वय ३९ रा. कर्हे वडगाव, ता. आष्टी,जि. बीड) असे कंटेनर चालकाचे नाव आहे.

सविस्तर वाचा : मद्यधुंद कंटेनर चालकाने रस्त्यावरील ३० हून अधिक वाहने उडवली..

  • पाटणा - बिहार राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली असून अनेक जिल्ह्यांतील नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीने बाहेर काढत आहेत. दरम्यान, बुरी गंडक नदीच्या पाण्यामुळे अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आणत असताना एका महिलेची बोटीतच प्रसूती झाली.

सविस्तर वाचा : बिहार: पुरातून बचाव करताना एनडीआरएफच्या बोटीत महिलेची प्रसूती

  • पुणे - दिवसेंदिवस पुण्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सव भव्य-दिव्य न करता साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. पुण्याचा गणेशोत्सव हा ऐतिहासिक, पौराणिक आणि जिवंत देखाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, यावेळी कोरोनाचे सावट असल्याने यंदा गणेशोत्सवात देखावे सादर होणार नाहीत. पण त्याची कल्पना नसल्यामुळे शहरातील काही मूर्तिकारांनी देखावे तयार करण्याच्या कामाला सुरुवातही केली होती. यंदाच्या देखाव्यात चालू घडामोडी वर भर देण्यात आला होता. यामध्ये कोरोना, आत्मनिर्भर, राम मंदिर यासारखे विषय होते. परंतु यावर्षी देखाव्यांना मागणी नसल्यामुळे देखावे साकारणाऱ्यासमोर आर्थिक संकट उभं राहिले आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सवात देखावे नाहीत..!

  • नवी दिल्ली - भारत चीनमध्ये मागील काही दिवसांपासून सीमावाद चिघळलेला आहे. पूर्व लडाखमधील हिंसाराचानंतर तणाव कमी करण्यासाठी बैठका सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघाला नसून दोन्ही देशांचे सैन्य सतर्क आहेत. भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण माहिती गोळा करणाऱ्या एमीसॅट (EMISAT) या उपग्रहाने नुकतेच चीनमधील तिबेटची पाहणी केली आहे.

सविस्तर वाचा - भारताच्या सॅटेलाईटने तिबेटची केली पाहणी, चिनी लष्कराच्या टिपल्या हालचाली

  • पुणे - पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका बंद घरामध्ये वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. काही दिवसापूर्वी या दाम्पत्याचा मृत्यू झाला असावा कारण हे दोन्ही मृतदेह अक्षरशः सडलेल्या अवस्थेत होते. संभाजी बापू शिंदे (75) आणि शोभा संभाजी शिंदे (70) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा - पुण्यात बंद घरात आढळले वृद्ध दाम्पत्याचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, कारण अस्पष्ट

  • मुंबई - मधुमेह आजारात भारत जगात दुसऱ्याच क्रमांकावर असून ही चिंतेची बाब आहे. याबाबत चिंता वाढवणारी आणखी एक बाब समोर आली आहे. कोरोना-लॉकडाऊनमुळे मधुमेह आजार असलेले रुग्ण मागील चार महिन्यापासून घरात आहेत. परिणामी त्यांच्या जीवनशैलीत बदल झाला असून ताण-तणाव, कोरोनाची भीती वाढली आहे. नियमितपणे वैद्यकीय तपासणी करता येत नाहीये.

सविस्तर वाचा - लॉकडाऊन इफेक्ट: रक्तातील साखरेची पातळी वाढलेल्या रुग्णांची संख्या 7 टक्क्यांनी वाढली

  • चंदिगढ - भारतीय बनावटीच्या कोरोना विरोधातील ‘कोवॅक्सिन’ या लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु झाल्या आहेत. भारत बायोटेक कंपनी, राष्ट्रीय विषाणू संस्था आणि आयसीएमआर या तीन संस्थाच्या प्रयत्नाने कोरोवरील लस तयार करण्यात येत आहे. हरियाणातील पोस्ट ग्रॅज्युइट इस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स(PGI) या संस्थेत पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु आहे.

सविस्तर वाचा - गुड न्यूज: कोवॅक्सिन लसीच्या पहिल्या टप्प्यात प्रगती...ट्रालयचा पहिला भाग पूर्ण

  • पुणे - कोरोनाच्या या कठीण काळात एकीकडे आरोग्य कर्मचारी रुग्णालयात जास्तीत जास्त कसे टिकवून ठेवता येईल, यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मात्र खासगी रुग्णालयांचा मुजोरपणा काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे पुण्यातील जहांगीर रुग्णालयाच्या नर्सिंग स्टाफला अक्षरशः रस्त्यावर उतरावे लागले आहे.

सविस्तर वाचा - ...म्हणून पुण्यातील जहांगीर रुग्णालयाचा 'नर्सिंग स्टाफ' रस्त्यावर, सामूहिक राजीनाम्याचा दिला इशारा

Last Updated : Jul 26, 2020, 11:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.