ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 AM : सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

author img

By

Published : Aug 1, 2020, 11:22 AM IST

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top 10 news at 11 am
सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

बस्तर (छत्तीसगड) - नक्षलवाद, आदिवासी आणि नैसर्गिक सौंदर्य या तिन्ही गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर तुम्हांला हे समजायला हवे की तुम्ही आता बस्तर येथे पोहोचला आहात. राज्यातील दक्षिण भागात हा परिसर आहे. ज्याठिकाणी 70 टक्के जनता आदिवासी आहे. येथील मोठ्या प्रमाणात असलेली आदिवासी जनता जंगलात वास्तव्य करते.

सविस्तर वाचा - छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तरमध्ये शिक्षणासाठी संघर्ष; नेटवर्कविना ऑनलाइन अक्षरे कशी गिरवणार?

पाटणा - सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आता त्याची बहीण श्वेता किर्ती हिने पुन्हा एकदा सुशांतसिंगचा फोटो प्रसिद्ध करत न्याय मागितला आहे. यावेळी तिने थेट पंतप्रधान मोदींकडे न्यायाची याचना केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर सुशांतचा फोटो शेअर करताना ती पोस्ट पंतप्रधान मोदींना टॅग केली आहे.

सविस्तर वाचा - माझ्या भावाला न्याय द्या.. सुशांतच्या बहिणीची पंतप्रधान मोदींकडे याचना

लखनऊ - दर महिन्याच्या एक तारीखेला गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो. तसेच काही बँकांनी आजपासून मिनिमम बँँलेंस न ठेेवल्ययास दंड वसूल करण्यााचा निर्णय घेतला आहे. त्या बरोबर अनलॉक-3 चे नवीन नियमावली लागू झाले आहेत. याचबरोबर अतिरिक्त बचत खाते वरील व्याज दर, ईपीएफ मधील योगदान, सुकन्या समृद्धि योजना, दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी आणि ई-कॉमर्स कंपनीच्या नियमाचा समावेश आहे.

सविस्तर वाचा - आजपासून अनलॉक-3 - ...तर बसेल आर्थिक फटका

राजूरा (चंद्रपूर)- भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने दोन चिमुरड्यांना चिरडले. यात एकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दूसरा गंभीर जखमी आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या नवेगाव वाघाडे येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सूमारास घडली. निथी पंढरी मेश्राम असे मृत मुलीचे नाव असून गंभीर जखमी असलेल्या आश्मित बंडू मेश्राम याचावर चंद्रपूरात उपचार सुरू आहे.

सविस्तर वाचा - पिकअपने दोन चिमुरड्यांना चिरडले; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, एक गंभीर

ठाणे - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तसेच त्यांच्या विचारांविषयीही आदर होता. बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांनी 1946 साली जग बदल घालूनी घाव हे गीत लिहिले होते, असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी सरचिटणीस कॉम्रेड सुबोध मोरे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - 'अण्णाभाऊंना डॉ. बाबासाहेबांविषयी नितांत आदर; त्यांनी कम्युनिस्ट पक्ष कधीही सोडला नाही'

पुणे - लोकमान्य बाळ गंगाधर टिकळ यांची आज १००वी पुण्यतिथी. स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्रीचा वापर करून लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र केले. ब्रिटीश सरकारविरोधात लढण्यास प्रोत्साहन दिले. केसरी वृत्त पत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने मांडले. टिळकांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट.....

सविस्तर वाचा - 'ईटीव्ही भारत'कडून लोकमान्य टिळकांना अभिवादन : 'लोकमान्यां'बाबत सांगत आहेत त्यांचे खापर पणतू, रोहित टिळक..

अमरावती- गाईच्या दुधाला 10 रुपये प्रति लिटर अनुदान, दुधाच्या भूकटीला 50 रुपये अनुदान,तसेच दुध खरेदी करायचे असल्यास 30 रुपये प्रति लिटरने दूध खरेदी करावे या मागणीसाठी भाजप सह आदी संघटना कडून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. परंतु माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडें यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीच्या नांदगाव पेठ टोल नाक्यावर करण्यात आलेल्या दूध आंदोलनासाठी दूध न मिळाल्याने आंदोलकांची चांगलीच फजिती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सविस्तर वाचा - अमरावतीत भाजपला आंदोलनासाठी दूध मिळेना; रिकामे कॅन घेऊन आंदोलन करण्याची वेळ

औरंगाबाद - कष्टकऱ्यांच्या चळवळीत आपल्या शाहिरीने प्रबोधन करणारे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जन्मशताब्दी. कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, चित्रपट, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णन, इ. अनेक साहित्यप्रकार आण्णाभाऊंनी हाताळले. यासोबतच अण्णांची चळवळीची गाणी आणि आंदोलनात जोश भरणारे लोकशाहीर म्हणून असलेली त्यांची प्रतिमा कायमच समाजाला प्रेरणा देत राहील.

सविस्तर वाचा - अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेष : 'एकजुटीचा नेता झाला'

ठाणे - कोणत्याही महापुरुषाच्या निर्वाणानंतर त्यांच्याबाबत अनेक दंतकथा समाजात, माध्यमात आणि नंतर लिखित स्वरुपातही प्रसारित होत जातात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतही अशा अनेक कथा प्रसारित करण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 16 ऑगस्टला अण्णाभाऊंनी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला आणि 'ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है' अशा घोषणा दिल्याचे सांगितले जाते.

सविस्तर वाचा - अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेष : 'ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है' असे अण्णा म्हणालेच नाही - कॉम्रेड सुबोध मोरे

ठाणे - लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार दिवस फेऱ्या मारुनदेखील पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. महिला पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांनी मला पोलीस ठाण्यातून हाकलून लावले, असा आरोप पीडितेने केला आहे.

सविस्तर वाचा - भाईंदरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार..४ दिवसांनंतर गुन्हा दाखल!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.