मुंबई - पी. व्ही. नरसिंहराव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्ताने, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राव यांना आदरांजली वाहिली आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशाशी संवाद साधणार आहेत... पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी दरम्यान वापरलेल्या डिझेलवर मिळणाऱ्या परताव्याची 7 कोटी 40 लाख इतकी रक्कम एप्रिल 2018 पासून थकीत आहे... सहा जणांनी एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या....
- हैदराबाद - भारताचे माजी पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंहराव हे राजकारणातील संन्यासी होते, या शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी नरसिंहराव यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
सविस्तर वाचा - भारताचे सुपुत्र पी. व्ही. नरसिंहराव राजकारणातील संन्यासी - डॉ. मनमोहन सिंह
- राष्ट्र निर्मितीसाठी सार्वजनिक धोरणे राबवण्याचे आणि प्रशासन चालवण्याचे त्यांचे कसब आणि मर्मदृष्टी. ज्यामुळे अनेकांनी त्यांना आधुनिक भारतातील चाणक्य ही उपाधी दिली, असे देशाचे महान विद्वान दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची २८ जून रोजी जन्मशताब्दी आहे. अल्पमताचे सरकार असताना ५ वर्षे पूर्ण कार्यकाळ यशस्वीरीत्या सरकार चालवण्याच्या त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे लोकांनी त्यांना आधुनिक चाणक्याची उपाधी दिली, अशा समाज सुधारक, शिक्षणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अभ्यासपूर्ण अष्टपैलू व्यक्तीमत्वाला सर्वप्रथम मी आदरांजली वाहतो.
सविस्तर वाचा - पी. व्ही. नरसिंह राव : आधुनिक भारतातील चाणक्य
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशाशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ११ वाजता रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधतील. दरम्यान, मोदी ६६ व्यांदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित करत असतात. यात ते वेगवेगळ्या विषयावर बोलतात.
सविस्तर वाचा - पंतप्रधान मोदी आज 'मन की बात'द्वारे साधणार देशाशी संवाद...
- जयपूर - तुम्ही जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत असाल, तुमच्याकडे चनल, विविध बिल्स तसेच ई-मेल मार्फत आर्थिक व्यवहार सांभाळत असाल, तर सावधान ! कारण आता तुमचे अकाऊंट 'ई-मेल फॉरवर्डर्स'च्या डोळ्यावर आहे. तुमच्या नकळत ई-मेल्स मार्फत महत्त्वाची माहिती आणि चलनांमधील रक्कम कधी बदलू शकते, हे सांगता येत नाही. सध्या हे ई-मेल फॉरवर्डर्स कॉर्पोरेट कंपन्यांना लक्ष करत आहेत.
सविस्तर वाचा -विशेष : 'कॉर्पोरेट सेक्टर'वर सायबर गुन्हेगारांचे लक्ष; 'ई-मेल फॉरवर्डींग'चा नवा फंडा
- पालघर - जिल्ह्यातील मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी दरम्यान वापरलेल्या डिझेलवर मिळणाऱ्या परताव्याची 7 कोटी 40 लाख इतकी रक्कम एप्रिल 2018 पासून थकीत आहे. यातील फक्त 50 लाख इतकीच रक्कम शासनाकडून मिळाली असून यामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत.
सविस्तर वाचा - पालघरच्या मच्छीमारांची डिझेल परतावा रक्कम अडकली, 7 कोटी 40 लाख मिळणार कधी?
- पंढरपूर (सोलापूर)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल तीन महिने संचारबंदीची झळ सहन केल्यानंतर पंढरपूर शहरात आता पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्याचे वारे वाहू लागले आहे. आषाढी यात्रा कालावधीत २९ जून ते २ जुलै या काळात चार दिवसांची संचारबंदी लावण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे पंढरपूर आणि परिसरातील नागरिक, महाराज मंडळी आणि व्यापारी वर्गातून नाराजीचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. या प्रकरणी आता आमदार भारत भालके हे याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
सविस्तर वाचा -पंढरीत पुन्हा संचारबंदीचा प्रस्ताव; स्थानिकांसह व्यावासायिकांमधून नाराजीचा सूर
- सोलापूर - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीला ग्रीनझोनमध्ये समावेश असलेल्या सोलापूर जिल्ह्यातही कोरोना विषाणूने कहर केला आहे. शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून आता खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सोलापुरातील मृत्यूदर व कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी मूलमंत्र दिला आहे. त्याची अंमलबजावणी केल्यास सोलापूर कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वाचा -सोलापुरला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी आखला नवा प्लॅन
- वर्धा - सहा जणांनी एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. नराधमांनी या महिलेच्या नवऱ्याला बांधून, नवऱ्यासमोर हे कृत्य केले. ही धक्कादायक घटना वर्ध्याच्या सावंगी मेघे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा शिवारात घडली.
सविस्तर वाचा - वर्ध्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आरोपींचा शोध सुरू
- हैदराबाद - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या लॉकडाऊन काळात बाल विवाहचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यात तेलंगणामध्ये जवळपास 204 बालविवाह झाले आहेत, असे तेलंगणा राज्य बाल संरक्षण आयोगाच्या (टीएससीपीसीआर) अहवालात म्हटले आहे.
सविस्तर वाचा - धक्कादायक..! गेल्या 3 महिन्यात तेलंगणामध्ये पार पडले 204 बालविवाह
- मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या आयोजनासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सर्व पर्यायांची चाचपणी करत आहे. त्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वकरंडक स्थगित होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयने दंड थोपटले आहेत. पण, यात पाकिस्तानने खोडा घातला आहे. पाक क्रिकेट बोर्डाने, पाकिस्तान प्रीमिअर लीग खेळवून झाल्यानंतर, ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आशिया चषकाचे आयोजन करण्याचे ठरवत, बीसीसीआयच्या मार्गावर अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे.
सविस्तर वाचा - IPL आयोजनामध्ये पाकचा खोडा, PSL चे आयोजन पुढे ढकलण्यास दिला नकार