मुंबई - योग हे एकतेचे प्रतिक असून वर्ण, लिंग, श्रद्धा, वंश आणि राष्ट्र अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव योगा करत नाही. ते माणूसकी टिकवण्याचे खूप मोठे माध्यम आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले... जयपूर योगास्थली योगा सोसायटीच्या संचालक आणि फाऊंडर हेमलता शर्मा ही १२ तासांहून अधिक काळ योगा करत विश्वविक्रम नोंदवणार आहे... भारत-चीन या देशाच्या संबंधाबाबत बोलताना, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६० साली केलेली चूक मोदींनी पुन्हा करू नये, असा सल्ला वरिष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांनी दिला आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली - योग हे एकतेचे प्रतिक असून वर्ण, लिंग, श्रद्धा, वंश आणि राष्ट्र अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव योगा करत नाही. योगा एक माणूसकी टिकवण्याचे खूप मोठे माध्यम आहे. कोरोना महामारीने जगभर थैमान घातले असताना, आजच्या घडीला योगाची पूर्वीपेक्षाही जास्त गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. आज सहावा जागतिक योग दिवस संपूर्ण जगभरात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी देशाला संबोधन केले.
सविस्तर वाचा - 'योग हे एकतेचे प्रतिक.. ते कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही'
- जयपूर - आज जागतिक योग दिन आहे. या दिनाच्या निमित्ताने, जयपूर योगास्थली योगा सोसायटीच्या संचालक आणि फाऊंडर हेमलता शर्मा ही १२ तासांहून अधिक काळ योगा करत विश्वविक्रम नोंदवणार आहे. हेमलता याच्या या योगा प्रात्यक्षिकाचे लाईव्ह प्रक्षेपण फेसबूकवरून करण्यात येत आहे.
सविस्तर वाचा - Yoga Day Special : जयपूरची हेमलता विश्वविक्रमासाठी करणार सलग १२ तास योगा
- नवी दिल्ली - लडाख प्रांताच्या पूर्वेला स्थित गलवान व्हॅलीत चीनी सैन्याने घुसखोरी करून भारतीय लष्करावर हल्ला चढवला. या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. तर चीनी सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी चिघळले आहेत. सध्या चीनकडून पुन्हा द्विपक्षीय चर्चेची मागणी होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत सरकारच्या सद्यस्थितीतील पवित्र्यावर भाष्य केले. दोन्ही देशांतील संबंधांबाबात स्वातंत्र्यापासून पुढे आलेल्या मुद्द्यांचा उहापोह केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६० साली केलेली चूक मोदींनी पुन्हा करू नये ,असा सल्ला त्यांनी दिला.
सविस्तर वाचा - नेहरूंनी केलेली चूक पुन्हा मोदींनी करू नये - सुधींद्र कुलकर्णी
- नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे खबरदारी म्हणून कोरोना लॉकडाऊनच्या धर्तीवर न्यायालयीन कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरू आहे. मात्र, प्रथमच, सर्वोच्च न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परस्पर संमतीने घटस्फोटाची मागणी करणार्या याचिकेला परवानगी दिली आहे.
सविस्तर वाचा - सर्वप्रथमच, सर्वोच्च न्यायालयाकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घटस्फोटाचा अर्ज मंजूर
- नवी दिल्ली - भारतासह जगभरात रविवारी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज घरात राहूनच योग दिन साजरा केला जात आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये अक्षरक्ष: हाडं गोठवणाऱ्या थंडीत योग करत योग दिन साजरा केला. जवानांनी तब्बल १८ हजार फुटांवर हा योग केला.
सविस्तर वाचा - आंतरराष्ट्रीय योग दिन : हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांचा योगा
- जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा संसर्ग आणि मृत्यूदराची चाचपणी करण्यासाठी शनिवारी (दि. 20 जून) केंद्रीय समिती जळगावात दाखल झाली होती. दोन सदस्यांच्या समावेश असलेल्या या समितीने जिल्हाधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका, कोव्हिड रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देऊन जळगावातील परिस्थिती जाणून घेतली. या समितीकडून दौऱ्याचा सविस्तर अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे.
सविस्तर वाचा - कोरोनाच्या वाढत्या मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर जळगावात केंद्रीय समितीकडून चाचपणी
- अमरावती - मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात पोटफुगी झालेल्या चिमुकल्या मुलांना गरम विळ्याचे चटके दिल्याचा अघोरी प्रकार समोर आला होता. या घटनेतील एका ८ महिन्याच्या पीडित मुलावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच शनिवारी महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयास भेट देऊन त्या मुलाच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच या अघोरी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले आहेत.
सविस्तर वाचा - अघोरी उपचारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करा; यशोमती ठाकूर यांचे निर्देश
- सांगली - खग्रास सूर्यग्रहण आज (ता. २१ ) दिसणार असून, नागरिकांनी ते सौर चष्म्यातूनच पहावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. यादिवशी अंनिसच्या वतीने लोकप्रबोधन केले जाणार आहे.
सविस्तर वाचा - ग्रहण हे सावल्यांचा खेळ, त्याचा आनंद लुटा; अंनिसचे आवाहन
- सांगली - संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठी १५ जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार असून अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग नियोजनाबाबत पुढील आठवड्यात कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वडनेरे समिती आणि लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या उपाय नुसार काम केले जाईल, असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती आढावा बैठक प्रसंगी बोलत होते.
सविस्तर वाचा - १५ जुलैपासून नदीकाठी एनडीआरएफ पथके तैनात होणार - जयंत पाटील
- सोलापूर - महानगरपालिकेतील 107 नगरसेवकांना कोरोना आपातकालीन परिस्थितीत काम करताना शासनस्तरावरील 50 लाखांचा विमा उतरविण्यात यावा, अशी मागणी सोलापुरातील नगरसेवक करत आहेत. अशा आशयाचे निवेदन नगरसेविका अनुराधा काटकर यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना दिले आहे.
सविस्तर वाचा - आम्हालाही 50 लाखांचे विमा कवच द्या, सोलापुरातील नगरसेवकांची मागणी