ETV Bharat / bharat

Top 10 news @10 am: सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी; वाचा एका क्लिकवर..

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

author img

By

Published : May 26, 2020, 10:23 AM IST

सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी
सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी

मुंबई - राज्यात कोरोनाने महाभयंकर परिस्थिती बनवली असतानाच दुसरीकडे राजकीय भूकंप होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (सोमावर) दुपारी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर रात्री त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेतली.

सविस्तर वाचा - राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?; राज्यपालांच्या भेटीनंतर शरद पवार मातोश्रीवर

मुंबई - सार्वजनिक बांधकाम मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर सोमवारी त्यांनी मुंबईत उपचारासाठी येण्याकरता एअर ॲम्ब्युलन्सची सोय केली होती. परंतु, या एअर ॲम्ब्युलन्स कंपनीकडून दिरंगाई झाल्याने शेवटी चव्हाण यांनी बाय रोड बारा तास प्रवास करून अखेर मुंबई गाठले.

सविस्तर वाचा - एअर ॲम्ब्युलन्सच्या दिरंगाईमुळे अशोक चव्हाणांनी बाय रोड गाठली मुंबई

मुंबई - कोरोनाने महाराष्ट्रासह मुंबईत मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर वडाळा येथील राम मंदिर येथे साजरा होणारा गणेशोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. आता हा गणेशोत्सव पुढच्या वर्षी माघी गणेश जयंतीला साजरा करण्याचा निर्णय जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीने घेतला आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाचा प्रभाव; वडाळा जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव रद्द

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. सोमवारी २,४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात १,१८६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

सविस्तर वाचा - राज्यात सोमवारी आढळले कोरोनाचे २,४३६ नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ५२ हजार ६६७ वर

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करायच्या की नाही? याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ऑनलाईन शिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या शाळा ऑनलाईन अभ्यासक्रमानेच (डिजीटल पद्धतीने) सुरू करण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय - वर्षा गायकवाड

नवी दिल्ली - एमएसएमई उद्योगांचे ५ लाख खोटी रुपये सरकारी संस्था, सार्वजनिक कंपन्या आणि मोठ्या उद्योगांकडे थकित असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते व्हिडिओद्वारे मेंबर्स ऑफ कोलकाता चेंबरच्या सदस्यांशी बोलत होते.

सविस्तर वाचा - 'मोठ्या उद्योगांसह सरकारकडे एमएसएमई उद्योगांचे ५ लाख कोटी रुपये थकित'

मुंबई - देशात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षांसाठी नियमित परीक्षा केंद्रासोबत अधिकची १ हजार ५०० परीक्षा केंद्र वाढविणार आहे. सीबीएसईच्या परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी एक ट्वीट करून दिली आहे.

सविस्तर वाचा - सीबीएसईसाठी १ हजार ५०० अधिक परीक्षा केंद्र वाढविणार, रमेश पोखरियाल यांची माहिती

नवी दिल्ली - अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने भारताच्या टी-20 संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये खेळत असल्याने मी देशासाठी टी-20 खेळू शकतो, असे हरभजनने म्हटले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा हरभजन येत्या जुलैमध्ये 40 वर्षाचा होईल.

सविस्तर वाचा - भारताकडून टी-20 खेळण्यास सज्ज : हरभजन

कोलंबो - आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शेहान मदुशनकाला श्रीलंकेच्या पोलिसांनी अमलीपदार्थ (हेरॉइन) ठेवण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लंकेच्या मदुशनकाने बांगलादेशविरुध्द एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती.

सविस्तर वाचा - ड्रग्जसोबत आढळला क्रिकेटपटू! पदार्पणाच्या सामन्यात घेतली होती हॅट्ट्रिक

मुंबई - मेक इन इंडिया संकल्पनेला प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या ‘वाह जिंदगी’ चित्रपटात संजय मिश्रा भूमिका साकारत आहेत. आता या चित्रपटाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि स्वदेशी जागरण मंचच्या सह-संयोजक डॉ. अश्विनी महाजन यांचे समर्थन मिळवले आहे.

सविस्तर वाचा - चित्रपट 'वाह जिंदगी'ला स्वदेशी जागरण मंचकडून मिळाले समर्थन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.