ETV Bharat / bharat

Top 10 news 10 am: सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी; वाचा एका क्लिकवर.. - Top 10 news 10 am

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी
सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी
author img

By

Published : May 23, 2020, 10:32 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्स‍िंगच्या माध्यमातून घेतलेल्या या बैठकीला शरद पवार, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव आणि एमके स्टालिन यांच्यासह इतर अनेक विरोधीपक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी यांनी आर्थिक पॅकेजवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारने जाहीर केलेले 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे, असे त्या म्हणाल्या.

सविस्तर वाचा - '20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा'

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला.

सविस्तर वाचा - राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई -राज्यभरातील व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमबीए-एमएमएस सीईटी या सामायिक प्रवेशाची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल आज (शनिवार) सकाळी ११ वाजता सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.

सविस्तर वाचा - एमबीए सीईटीचा आज निकाल, सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर होणार जाहीर

मुंबई - राज्यात आज २९४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. राज्यात आज ८५७ कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत.

सविस्तर वाचा - राज्यात आज सर्वाधिक २९४० रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांचा आकडा ४४ हजारांच्या वर

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या टाळेबंदीत नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असताना, मुंबईचे पालकमंत्री तोंड लपवून बसले आहेत का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. एकीकडे विरोधपक्षांच्या हिट लिस्टवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आता त्यांचे पुत्र मुंबई शहराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात येत आहे.

सविस्तर वाचा - संकटकाळात पालकमंत्री कुठे गायब? आदित्य ठाकरेही विरोधकांच्या निशाण्यावर

नवी दिल्ली - देशभरात टाळेबंदीने अनेक कंपन्यांमध्ये नोकऱ्यात कपात होत असताना दिलासादायक वृत्त आहे. अ‌ॅमेझॉन इंडियाने ५० हजार कर्मचारी हंगामीतत्वावर घेणार असल्याचे जाहीर केले. देशभरात टाळेबंदी असल्याने ऑनलाईन उत्पादनांची ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी नवे कर्मचारी घेणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सविस्तर वाचा - टाळेबंदीतही अ‌ॅमेझॉन इंडिया देणार ५० हजार नोकऱ्या; 'हे' आहे कारण

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे देशातील रेस्टॉरंट उद्योगाला मोठा फटका बसला आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एनआरएआय) प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी व्हिडिओद्वारे संवाद केला. यावेळी संघटनने धोरणात्मक आणि चलनाच्या तरलेतमधून मदत करण्याची अर्थमंत्र्यांना विनंती केली.

वाचा सविस्तर - केंद्रीय अर्थमंत्र्यांशी रेस्टॉरंट संघटनेची चर्चा; मदतीची केली मागणी

नवी दिल्ली - भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची कर्णधारपदाची शैली विराट कोहलीपेक्षा अगदी वेगळी दिसते. रोहितचे नेतृत्त्व महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच आहे, असे सुरेश रैनाने म्हटले. रोहितचा शांत स्वभाव आणि खेळाडूंना प्रेरणा देण्याची क्षमता धोनी सारखीच असल्याचेही रैना म्हणाला.

सविस्तर वाचा - रोहितचे नेतृत्त्व महेंद्रसिंह धोनीसारखे - सुरेश रैना

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिला समुद्र तटाची खूप आठवण येत आहे. इलियानाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यात ती व्हाइट कट आउट स्विमसूटमध्ये दिसत आहे.

सविस्तर वाचा - इलियाना डिक्रुजला सतावतेय समुद्रविहाराची आठवण

मुंबई - बॉलिवूडचा सुपरहिरो ह्रतिक रोशन पुन्हा एकदा निळ्या डोळ्यांच्या परग्रहावरुन आलेल्या जादूसोबत झळकणार आहे. 'क्रिश ४' या चित्रपटात ह्रतिक आणि जादूची जोडी पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. क्रिशच्या यशस्वी फ्रांचाईसपैकी एक असलेला हा आगामी चित्रपट भरपूर नाट्यमय आणि मनोरंजक असेल.

सविस्तर वाचा - 'क्रिश ४' मध्ये अवतरणार निळ्या डोळ्यांचा 'जादू', ह्रतिकने दिले संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.