- नवी दिल्ली - कंटेनर पलटल्यामुळे 6 युवकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरोहाच्या मोहम्मदाबादमध्ये ही घटना घडली आहे.
सविस्तर वाचा - अमरोहामध्ये कंटेनर पलटल्यामुळे 6 युवकांचा मृत्यू
- नवी दिल्ली - मालेगाव 2008 बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर आज सोमवारी न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत. बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या 12 वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात 3 डिसेंबर 2020 पासून नियमित सुनावणी सुरू आहे. त्याची दुसरी सुनावणी 19 डिसेंबरला विशेष एनआयए न्यायालयात घेण्यात आली होती. मात्र, सुनावणीवेळी आरोपी गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना आता आज म्हणजेच 4 जानेवरीला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
सविस्तर वाचा - हाजीर हो! साध्वी प्रज्ञासिंह आज न्यायालयात हजर होणार
- मुंबई - 1993 मध्ये राजधानी मुंबईत घडलेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असेलेल्या रुबीना सुलेमान मेमनला मुंबई उच्च न्यायालयाने 6 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. न्यायाधीश एस एस शिंदे व न्यायाधीश अभय अहुजा यांच्या खंडपीठाने हा पॅरोल मंजूर केला.
सविस्तर वाचा - 1993 साखळी बॉम्ब स्फोटातील महिला आरोपीला 6 दिवसांचा पॅरोल; 'हे' आहे कारण
- मुंबई - शहरातील महाकाली गुहेच्या जागेवरून भाजपच्या नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली होती. त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष बहकलेला आहे, त्यांना त्यांच्या जबाबदारी आणि कर्त्यव्या बाबत प्रशिक्षण द्यायला हवे, महाराष्ट्राच्या कोणत्याही विकास कामाला विरोध करण्याचे यांचे धोरण म्हणजे, चहा पेक्षा किटली गरम अशी टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपाच्या इतर नेत्यांवर केली आहे.
सविस्तर वाचा - पत्रमहर्षी उचला लेखणी, अन् फाडा गळक्या किटल्यांचा बुरखा - शिवसेना
- सातारा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे आज सकाळी निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
सविस्तर वाचा - काँग्रेसचे माजी मंत्री विलासकाका उंडाळकरांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन
- गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये निर्माणाधीन छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझियाबादमधील मुरादनगर भागातील स्मशानभूमीत छत बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांच्या अंगावर निर्माणाधीन छत कोसळून हा अपघात झाला आहे.
सविस्तर वाचा - स्मशानभूमीतच काळाचा घाला; छत कोसळल्याने 25 जणांचा मृत्यू
- मुंबई - कोरोना विषाणू विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणूबाबत दोन लसींना मान्यता दिली आहे. मुंबईमध्ये लस प्राप्त होताच पुढील २४ तासात लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. हा पहिला टप्पा पंधरा दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. यासाठी प्रतिदिन १२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट्ये ठेवले आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली.
सविस्तर वाचा - १५ दिवसात बीएमसी करणार पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
- नवी दिल्ली - केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज 40 वा दिवस आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात चर्चेची सातवी महत्त्वपूर्ण फेरी आज पार पडणार आहे. रविवारी चर्चेच्या एक दिवस आधी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत बैठक घेतली.
सविस्तर वाचा - दिल्ली कृषी आंदोलन : शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आज चर्चा
- मुंबई - शुक्रवारी रात्री 25 वर्षीय फॅशन डिझायनरने चार्टर्ड अकाउंटं विरुद्ध वाकोला पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 367 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपी फुरकान खान याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
सविस्तर वाचा - फॅशन डिझायनरने केला सीएवर बलात्काराचा गुन्हा दाखल
- मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगणा रानौत यांच्यात वाद सुरू आहे. या दरम्यान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी खार येथे पावणे चार कोटींचे कार्यालय खरेदी केले आहे. मात्र, या व्यवहाराचा शिवसेना प्रवेशाशी किंवा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही, असे उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केले आहे. मी या सर्व व्यवहाराचे कागदपत्रे द्यायला तयार आहे. त्याबदल्यात कंगनाने ड्रग्ज घेणाऱ्यांची यादी एनसीबीला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सविस्तर वाचा - कंगनाने ड्रग्ज घेणाऱ्यांची यादी एनसीबीला द्यावी - उर्मिला मातोंडकर