- मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी दिलेल्या निर्देशानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने आज (दि. 30 ऑगस्ट) आपला अहवाल तयार केला. त्या अहवालावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांचे पर्याय आणि त्यासाठी असलेल्या अडचणी काय आहेत. याविषयीचे वास्तव अहवालातून समोर आल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाली. हा अहवाल उद्या (दि. 31 ऑगस्ट) सरकारकडे सादर केला जाणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. तसेच राज्यपालसोबतही याविषयी चर्चा तातडीने केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
सविस्तर बातमी वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी कुलगुरू समितीची बैठक संपली, उद्या सरकारला सादर करणार अहवाल
- नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांनी एनईईटी आणि जेईईबद्दल बोलावे अशी लोकांची इच्छा होती. मात्र, त्यांनी 'परीक्षा पे चर्चा' करायची टाळून 'खिलोने पे चर्चा' केली, असा टोमणा राहुल यांनी मारला.
सविस्तर बातमी वाचा - 'पंतप्रधानांनी 'परीक्षा पे चर्चा' करायची टाळून केली 'खिलोने पे चर्चा'
- नवी दिल्ली - 'अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम कधीच या कॅरेबियन बेटाचा नागरिक झाला नाही,' असे डोमिनिका सरकारने म्हटले आहे. दाऊद या देशाचा नागरिक असल्याचे किंवा अशा प्रकारचे इतर कोणतेही वृत्त कोणत्या प्रकाशकाने किंवा माध्यमाने दिले असल्याचे ते धादांत खोटे आहे, असे येथील सरकारने म्हटले आहे.
सविस्तर वाचा - दाऊद इब्राहिम आमच्या कॅरेबियन बेटाचा नागरिक नाही - डोमिनिका सरकार
- मुंबई - आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी,अशी ओळख असलेल्या धारावी पुनर्विकासाचे घोंगडे गेली 16 वर्षे भिजत आहे. धारावी पुनर्विकास पुन्हा आणखी काही वर्षे लांबणार आहे. कारण आता या प्रकल्पासाठी फेरनिविदा काढण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेवर आता धारावीकरांनी संताप व्यक्त करत थेट सरकारविरोधात दंड थोपटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धारावीतील सर्व संघटना एकत्र येणार असून, सरकारने त्वरित पुनर्विकास मार्गी लावावा या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. त्याचवेळी रस्त्यावरचीही लढाई पुन्हा तीव्र करणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा धारावीकर विरुध्द सरकार असा संघर्ष पहायला मिळणार आहे.
सविस्तर वाचा - पुनर्विकास प्रकल्पासाठी धारावीकर एकवटले; आता लढणार दुहेरी लढाई
- मुंबई - १४ जूनला सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच संदीप सिंहने भाजपच्या एका नेत्याला भेटून ब्रिफिंग दिले तो नेता कोण? याची चौकशी केल्यास ते स्पष्ट होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे. संदीप सिंह आणि भाजप यांच्या संबधाबाबत ‘ये रिश्ता क्या कहलाता है’? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
सविस्तर वाचा - सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर संदीप सिंहने ब्रिफिंग केलेला नेता कोण?; सचिन सावंतांचा भाजपाला सवाल
- मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुमारे १७ तास चौकशी करण्यात आली. आज रविवारी रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी हे तिघेही सीबीआयसमोर हजर झाले असून गेल्या चार तासाहून अधिक काळ त्यांची चौकशी केली जात आहे.
सविस्तर वाचा - सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू
- नंदुरबार - शहादा तालुक्यातील उभा दगड आणि धोनोरा बुद्रुक ही दोन गाव स्वातंत्र्यापासून आजघडीपर्यंत विकासापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, उभा दगड या गावातून आचार्य विनोबा भावे यांनी जंगल सत्यागृहाचा शुभारंभ केला होता. इतिहासाच्या पानात नोंद असलेले हे गावच विकासापासून कोसो दूर आहे. राजकीय नेते फक्त निवडणूकीत आश्वासन देतात पण यावर काहीच करत नाहीत, अशी ओरड ग्रामस्थांची आहे.
सविस्तर वाचा - मूलभूत सुविधासाठी उभा दगड व धानोरा गावातील नागरिकांचा संघर्ष सुरूच
- लातूर - चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक येथे 13 दिवसाच्या चिमुरडीला चक्क पाण्याच्या ड्रममध्ये टाकून मारल्याची घटना घडली आहे. दुर्दैव म्हणजे मुलीच्या मामानेच सारखी रडतेस का म्हणून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
सविस्तर वाचा - 'कृष्णा'ने केले कंसकृत्य..! 13 दिवसाच्या भाचीची ड्रममध्ये टाकून केली हत्या
- दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी चाहत्यांना एक गोड बातमी दिली. अनुष्का शर्मा गर्भवती असून पुढच्या वर्षी जानेवारीत आम्ही पालक होऊ, असे विराटने सांगितले होते. या बातमीनंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे ५ वर्षांपूर्वीचे एक ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
सविस्तर वाचा - विराट 'या' तारखेला होणार बाबा... जोफ्रा आर्चरचे ५ वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल!
- मुंबई - चेन्नई सुपर किंग्जच्या १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आयपीएलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. या बातमीनंतर बीसीसीआयनेही १३ सदस्यांना संसर्ग झाल्याची पुष्टी केली. यात दोन खेळाडू असल्याचेही बीसीसीआयने सांगितले. मात्र, मंडळाने या दोन खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. पण, माध्यमांच्या वृत्तानुसार चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरचे यात नाव आहे.
सविस्तर वाचा - ''तू खरा लढवय्या आहेस'', सीएसकेच्या कोरोनाग्रस्त खेळाडूला बहिणीकडून धीर