- इस्लामाबाद (पाकिस्तान) - पाकिस्तानने अफगानिस्तानच्या तालिबानवर काही आर्थिक प्रतिबंध लावले आहेत. अमेरिकेच्या नेतृत्ताव शेजारी राष्ट्रात शांती प्रक्रिया सुरू असताना त्याने तालिबानवर प्रतिबंध लावले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने 88 प्रतिबंधित दहशतवादी संघटना तसेच हाफिज सईद, मसूद अजहर आणि दाऊद इब्राहिमवर आर्थिक प्रतिबंध लावले आहेत.
हेही वाचा - काळ्या यादीत नाव येऊ नये म्हणून पाकची धडपड, दाऊद इब्राहिमसह ८८ दहशतवादी संघटनांवर निर्बंध
- मुंबई - राज्यात शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - राज्यात दिवसभरात १४ हजार ४९२ नवे कोरोनाबाधित, ९ हजार २४१ रुग्ण कोरोनामुक्त
- औरंगाबाद- कोरोनाचा देशात प्रसार केल्या प्रकरणी मरकज धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या भारतीय व विदेशी लोकांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि एम. जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने दिला. त्यामुळे विदेशातून आलेल्या व भारतात अडकलेल्या सर्व विदेशी भाविकांचा मायदेशी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा - मरकज प्रकरणातील 'ते' गुन्हे रद्द, औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय
- इस्लामाबाद - पाकिस्तान एफएटीएफ पाकिस्तानवर नजर ठेवून आहे. मनी लाँड्रीग आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याच्या आर्थिक व्यवहारांमुळे पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवण्यात आले आहे. ऑक्टोंबर महिन्यात एफएटीएफची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 88 दहशतवाद्यांवर प्रतिबंध लावला आहे. ही कारवाई पाकिस्तानने फक्त काळ्या यादीत जाण्यापासून वाचण्यासाठी केली असल्याचं बोललं जात आहे. ज्या दहशतवाद्यांवर प्रतिबंध लावला आहे. ते दहशतवादी आईएस, अल कायदा आणि तालिबान संघटनेशी संबधित आहेत.
हेही वाचा - एफएटीएफ बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा आटापिटा ; 88 दहशतवाद्यांवर प्रतिबंध
- जिनिव्हा - कोरोनाच्या लसीचे उत्पादन लवकरच होण्याची शक्यता असताना जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त होणार मत व्यक्त केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी जगभरात सुरू असलेली महामारी दोन वर्षात संपेल, असे सांगितले. ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यां नी महामारीत राष्ट्रीय एकता व जागतिक दृढ ऐक्य ठेवण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित केले.
हेही वाचा - चिंताजनक.. कोरोना महामारी दोन वर्ष राहणार, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
- राज्यात आज सर्वत्र गणेशाचे आगमन झाले. मोठ्या उत्साहास साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याने सर्वत्र साध्या पद्धतीने बाप्पांच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्यातील विविध राजकीय नेत्यांनीही आपापल्या घरी बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे घातले आहे.
हेही वाचा - कोरोनाचे विघ्न दूर कर, राजकीय नेत्यांचे बाप्पांना साकडे
- मुंबई- मुंबई महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे हा सण अत्यंत साधे पणाने साजरा केला जात आहे. रविवारी दीड दिवसाचे, त्यानंतर पाच, सात आणि अकरा दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. भाविकांना गणेश मूर्ती विसर्जन करता यावे म्हणून पालिकेने समुद्र किनाऱ्यावर ७० ठिकाणी तसेच १६८ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत. या विसर्जनाच्या ठिकाणी पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
हेही वाचा - मुंबई महापालिका गणेश विसर्जनासाठी सज्ज; नियम पाळूनच विसर्जन
- नवी दिल्ली – राफेलच्या लढाऊ विमान खरेदीतील भ्रष्टाचारावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर नव्याने हल्ला चढविला आहे. सरकारने राफेलच्या खरेदीत भ्रष्टाचार व अपहार केल्याचा राहुल गांधींनी दावा केला आहे.
हेही वाचा - राफेल खरेदीच्या सौद्यावरून राहुल गांधींचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले...
- नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी आयसीसच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्यानंतर अयोध्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. संशयित दहशतवाद्यास घातपाताच्या कारवायांसाठी अफगानिस्तानातील खुरासान येथून आदेश मिळत होते, अशी माहिती आहे.
हेही वाचा - अयोध्यामध्ये हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट; हाय अलर्ट जारी
- चंदीगड - पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरी करणाऱ्या 5 संशयित लोकांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी कंठस्नान घातले. ही माहिती सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सविस्तर वाचा - पंजाबमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या 5 संशयितांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी घातले कंठस्नान