ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री ११ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..

रात्री ११ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..

news
रात्री ११ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..
author img

By

Published : Jun 26, 2020, 11:03 AM IST

Updated : Jun 26, 2020, 10:57 PM IST

  • मुंबई - एका बाजूला अनलॉक होत असताना राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात आज(शुक्रवार) कोरोनाच्या ५ हजार २४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. यासह वाचा टॉप टेन बातम्या . . . . .

सविस्तर वाचा - कोरोना अपडेट : शुक्रवारी सर्वाधिक ५०२४ नव्या रुग्णांची नोंद, १७५ जणांचा मृत्यू

  • पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील दापचरी येथे आज(शुक्रवार) कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे.

सविस्तर वाचा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जण जागीच ठार

  • नवी दिल्ली - नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 जुलैपर्यंतची नियोजित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाने रद्द केली आहे. मात्र काही ठराविक मार्गांवरील विमान सेवा सुरु ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

सविस्तर वाचा - 15 जुलैपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा रद्द, मोजक्या फ्लाईट सुरु राहण्याचे संकेत

  • औरंगाबाद - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वच विरोधीपक्ष आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मनसेने त्यांच्या राडा स्टाईलमध्ये उपायुक्तांवर खुर्ची उगारत प्रशासनाचा निषेध नोंदवला. मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी महानगरपालिका उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासोबत गैरवर्तन केले. हे प्रकरण चिघळत असल्याचे कळताच पोलिसांनी मध्यस्थी करत दाशरथे यांना दालनाच्या बाहेर नेले. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा - औरंगाबाद पालिका : उपायुक्तांच्या दालनात मनसे जिल्हाध्यक्षांचा राडा

  • मुंबई - राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय शिक्षण विभागाने जारी केला नसला तरी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मात्र आज एक नवीन नियमावली जारी केली आहे. यानुसार शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात आली असली तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना आठवड्यातून 2 वेळा शाळेत हजर राहावे लागणार आहे.

सविस्तर वाचा - शिक्षकांनो, आठवड्यातून 2 वेळा शाळेत हजर रहा; अतिरिक्त शिक्षकांनाही मिळणार काम

  • नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटाने अनिश्चिततेचा सावट असताना अर्थव्यवस्था लवकर सावरण्याची चिन्हे दिसत नाही. अशा स्थितीत सोन्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांचे मते देशात सोन्याचे दर येत्या काही महिन्यात दिवाळीपर्यंत 52 हजार रुपये प्रति तोळा होण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती राहिली तर सोने दोन वर्षात प्रति तोळा 65 हजार रुपये होईल, असाही तज्ज्ञांनी अंदाज केला आहे. ऑगस्टच्या सौद्यांसाठी बुधवारी मल्टा कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचा दर प्रति तोळा 48,589 रुपये झाला होता. हा आजपर्यंतचा सोन्याचा सर्वाधिक दर राहिला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अजूनही विक्रमी झाले नाहीत. येत्या काही दिवसात सोन्याचे दर विक्रमी होणार आहेत.

सविस्तर वाचा - सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 52 हजार होण्याची शक्यता; ‘ही’ आहेत कारणे

  • मुंबई - काही वर्षांपासून तथाकथित सुंदरतेचे प्रतिक समजली जाणारी आणि गोरेपणाच्या भावनेला प्रोत्साहन देणाऱ्या 'फेयर अँड लव्हली' क्रीमचे नाव आता बदलण्यात येणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ने आपल्या या ब्युटीब्रँडच्या नावातून 'फेयर' हा शब्द हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व क्षेत्रातून आणि समुदायातून स्वागत होत आहे. बॉलिवूड सेलेब्रिटीजनीही याला पाठिंबा दर्शवला आहे. याला समर्थन देताना अभिनेत्री कंगना रनौतने म्हटले आहे, "ही लांबलचक आणि कधी कधी एकट्याने लढवली गेलेली लढाई आहे. परंतु परिणाम तेव्हाच होतो जेव्हा संपूर्ण देश यात सहभाग घेतो."

सविस्तर वाचा - 'फेयर अँड लव्हली' क्रीमचे नाव बदलणार, 'फेयर' शब्द हटवण्याने सुटणार का प्रश्न ?

  • मुंबई - भारताचा शेजारी देश चीन, हा सीमेवर सातत्याने कुरापती काढत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरले आहे. तसेच सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे, असा आरोप करत सरकारला याचा जाब विचारण्यासाठी तसेच २० हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेसने आज (शुक्रवार) राज्यव्यापी आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सध्या भारत-चीन सीमेवर जे घडत आहे त्यातून आपले परराष्ट्रीय धोरण चुकलेले दिसते. आजपर्यंत चीनला आपण रोखले होते. मात्र, आज ती स्थिती राहिली नसून सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार कमी पडले, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
  • सविस्तर वाचा - देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी : काँग्रेस

कोलकाता: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे इंस्टाग्राम अकाऊंट कोणीतरी चालवत असल्याचा धक्कादायक आरोप ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार रूपा गांगुली यांनी केला आहे. रूपा यांनी पुढे असा आरोप केला आहे की पुरावे देऊन छेडछाड करण्याच्या प्रयत्नातून दिवंगत अभिनेत्याच्या खात्यातून पोस्ट हटवली जात आहेत. रुपा गांगुली यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हे आरोप केले आहेत, हिंदी भाषेत हा व्हिडिओ आहे. "काय जोडले जात आहे आणि काय हटविले जात आहे हे कोणालाच माहिती नाही. कोणीतरी त्याचे खाते कसे चालवित आहे? ते पोलिस आहे की इतर कोणी? आता त्याचे इंस्टाग्राम अकाउंट चालू कसे आहे?" असे त्यांनी विचारले आहे.

सविस्तर वाचा - सुशांतचे सोशल मीडिया अकाऊंट कोण चालवत आहे? 'महाभारत' फेम रुपा गांगुलींचा गंभीर आरोप

  • बीड - कधी शासनाच्या धोरणाचा तर कधी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वात आधी बसतो तो शेतकऱ्यांना... सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे बीड जिल्ह्यात जानेवारी 2020 ते 26 जून 2020 या सहा महिन्यात 82 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बीड जिल्ह्यात चक्क प्रत्येक बारा तासात एक आत्महत्या होत असल्याचे शासनाच्या शेतकरी आत्महत्या अहवालात समोर आले आहे. बळीराजाच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

सविस्तर वाचा - ऊसतोड मजुरांचा नव्हे, शेतकरी आत्महत्येचा जिल्हा; बीडमध्ये प्रत्येक 12 तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या

Last Updated : Jun 26, 2020, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.