- मुंबई : राज्यात आज १० हजार ४४१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ७१ हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के असून, आज ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत.
सविस्तर वाचा : राज्यात १०,४४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; तर ८,१५७ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
- मुंबई - केंद्र सरकारने अनलॉक-3 दरम्यान राज्य सरकारांकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादता व्यक्ती, माल वाहतूक आणि इतर सेवांना परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर राज्यात आता गणेशोत्सवाचा काळ संपताच ई-पास आणि इतर निर्बंधांसंदर्भात नव्याने विचार केला जाणार आहे. त्यासाठीचे संकेत मुख्य सचिव संजयकुमार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिले. ई-पास संदर्भातही सूट दिली जाणार असून त्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सविस्तर वाचा : गणेशोत्सवानंतर ई-पास रद्द होण्याची शक्यता, मुख्य सचिवांनी दिले संकेत
- नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपण स्वतःच्या खांद्यावर घेणार नाही. मात्र, नवे नेतृत्व उदयास यावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यांना लिहिलेल्या पत्राचे उत्तर म्हणून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सविस्तर वाचा : सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडणार.. पक्ष नेत्यांच्या पत्राला नवीन अध्यक्ष शोधण्याचे उत्तर
- मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यासाठी एक ट्विट करून त्यांनी हा दावा केला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही आरोप केले आहेत.
सविस्तर वाचा : सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह
- पुणे - अजित पवार यांना दाऊदबाबत विचारणा केली असता, अरे कशाला दाऊद, दाऊद करत बसलात अरे म्हणत दाऊदबाबतचा निर्णय केंद्र सरकार व संबंधित अधिकारी घेतील. त्यामुळे या विषयावर बोलून वाद निर्माण करणार नाही, अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावधतेची भूमिका घेतली.
सविस्तर वाचा : 'अरे कशाला दाऊद.. दाऊद करत बसलात'
- पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरू आहे. पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) व्यक्त केले. सोबतच पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थनाही केली.
सविस्तर वाचा : ८०० बेड्सचे सुसज्ज जम्बो कोविड सेंटर तयार; मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन
- मुंबई - केंद्र सरकारने अनलॉक-3 दरम्यान राज्य सरकारांकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादता व्यक्ती, माल वाहतूक आणि इतर सेवांना परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर राज्यात आता गणेशोत्सवाचा काळ संपताच ई-पास आणि इतर निर्बंधांसंदर्भात नव्याने विचार केला जाणार आहे. त्यासाठीचे संकेत मुख्य सचिव संजयकुमार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिले. ई-पास संदर्भातही सूट दिली जाणार असून त्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सविस्तर वाचा - आवाजावरुन कोरोनाची चाचणी करणाऱ्या व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाला सुरुवात
- इस्लामाबाद - फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स' (एफएटीएफ) द्वारे काळ्या यादीत घातले जाईल, या भीतीपोटी अखेर पाकिस्तानने दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये किनारपट्टीच्या ठिकाणी राहत असल्याचे कबूल केले होते. त्यानंतर 24 तासांच्या आतच पाकिस्तानने आपल्या वक्तव्यावरून यु-टर्न घेतला आहे. दाऊद पाकिस्तानमध्ये नाही, असे इमरान खान सरकारने म्हटलं आहे.
सविस्तर वाचा - पाकचा यु-टर्न.. इमरान खान आता म्हणतात दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये नाही
- मुंबई - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर वायरमन (तारतंत्री) पदाच्या नोकरीसाठी पात्र असलेल्या पण आवश्यक प्रशिक्षणाअभावी नोकरीपासून वंचित राहिलेल्या तरुणांना आयटीआय मध्ये प्रशिक्षण मिळणार आहे.वया विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी यंदा विद्युत वितरण कंपनी आणि आयटीआय यांच्यामार्फत राज्यातील पात्र ५६९ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
सविस्तर वाचा - अनुकंपासाठी पात्र तरुणांना आयटीआय देणार वायरमनचे प्रशिक्षण - नवाब मलिक
- लंडन- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा लिलाव शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने इंग्लंडमध्ये झाला. या लिलावात चष्म्याची खरेदी करण्यासाठी 2 लाख 60 हजार पौंड इतकी बोली लावण्यात आली. भारतीय चलनात याची किंमत 2 कोटी 55 लाख रुपये होते. महात्मा गांधींच्या या चष्म्याच्या कडांवर सोन्याचा मुलामा लावलेला आहे. ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन हाऊसतर्फे या चष्म्याचा लिलाव 21 ऑगस्टला करण्यात आला.
सविस्तर वाचा - महात्मा गांधींच्या चष्म्याचा इंग्लंडमध्ये लिलाव; 2 कोटी 55 लाखांची बोली