नवी दिल्ली - देशातील गरिबांच्या फायद्यासाठी पंतप्रधान मोदींनी किमान उत्पन्न हमी योजना( न्याय योजना) लागू करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच भारतीय भूभागातून चीनी सैनिक कधी माघारी जातील? याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे...तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले त्यामध्ये ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे...यासह महत्वाच्या १० बातम्या...
- नवी दिल्ली - देशातील गरिबांच्या फायद्यासाठी पंतप्रधान मोदींनी किमान उत्पन्न हमी योजना( न्याय योजना) लागू करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच भारतीय भूभागातून चीनी सैनिक कधी माघारी जातील? याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.
सविस्तर वाचा - 'कोरोना संकटात गरिबांना दिलासा देण्यासाठी 'न्याय' योजना लागू करा'
- मुंबई - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले त्यामध्ये ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा - 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढवण्याची मागणी मान्य'
- मुंबई - महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली जाणार आहे.
सविस्तर वाचा - अनलॉक २.० : सरकारने कंबर कसली; 'या' गोष्टींवर बंदी कायम
- नागपूर - महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महापौर, सत्ताधारी आणि विरोधक, असा सामना रंगला असताना या वादात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतली आहे. गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे आयुक्त मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मुंढे यांनी बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - ...म्हणून गडकरींनी आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात केली तक्रार
- मुंबई - राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे निवृत्त झाले असून त्यांनी राज्याचे नवे सचिव संजीव कुमार यांच्याकडे पदभार सोपवला. कुमार यांनी मेहतांकडून सूत्रे स्वीकारली आहेत. तसेच आता अजोय मेहता हे मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
सविस्तर वाचा - मुख्य सचिव अजोय मेहता निवृत्त, राज्याच्या प्रशासनाचा गाडा संजीव कुमारांनी स्वीकारला
- नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात झाला असून अनेक देशामंधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात रुग्णांनी 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जगभरातील अनेक नामांकित कंपन्या आणि संस्था कोरोनावर लस शोधत आहेत. अनेक लसी विकासाच्या तिसऱ्या टप्प्यावरही पोहोचल्या आहेत. अशात पंतप्रधान मोदींनी कोरोना लसीवरून महत्त्वाचे वक्तव्य केल आहे.
सविस्तर वाचा - कोरोना लसीवर पंतप्रधान मोदींचं महत्त्वाचं वक्तव्य; लसीकरणासाठी चार मार्गदर्शक तत्वे आखली
- बिजिंग - भारताने काल (सोमवार) देशाच्या आणि नागरिकांच्या माहितीच्या सुरक्षेचे कारण देत 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. यामध्ये भारतात लोकप्रिय झालेल्या शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकचाही समावेश आहे. चीनने भारताच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. भारतातील चिनी गुंतवणूकदारांच्या कायदेशीर आणि वैधानिक हक्कांची जबाबदारी भारताची असल्याचे चीनने म्हटले आहे.
सविस्तर वाचा - 59 अॅप्सवर भारताने बंदी घातल्यानंतर चीननं व्यक्त केली चिंता...म्हणाले
- भंडारा - सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची इच्छा नसतानाही पाल्यांना मोबाईल, टॅबलेट द्यावा लागत आहे. या मोबाईलच्या उपयोगामुळे मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही काळजी घेतल्यास पालक आपल्या मुलांचे डोळ खराब होण्यापासून नक्कीच वाचवू शकतील. याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
सविस्तर वाचा - ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा अधिक वेळ स्क्रिनवर, डोळ्यांसाठी '२०-२०चा फार्म्युला' महत्त्वाचा
- साडेतीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारी यंदा होऊ शकलेली नाही. यंदाची वारी चुकल्याची हुरहूर जशी वारकऱ्यांच्या मनात आहे, तशीच कलाकारांच्या मनातही आहे. विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी गायक महेश काळे, कवी- गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांनी ‘विठ्ठला...'हे एक आगळे-वेगळे गाणे तयार केले आहे.
सविस्तर वाचा - वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारं गायक महेश काळेचं गाणं ‘विठ्ठला..!’
- नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. इतकेच नव्हे तर, द्रविड क्षेत्ररक्षणातही 'दादा' असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. भारताचा स्टार फिरकीपटू हरभजन सिंगने द्रविडच्या याच क्षेत्ररक्षणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सविस्तर वाचा - भज्जीने शेअर केला द्रविडच्या 'त्या' कामगिरीचा व्हिडिओ