ETV Bharat / bharat

Top 10 @ 5 PM : सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - टॉप 10 बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा, एका क्लिकवर...

todays-top-ten-news-at-5-pm
सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Aug 9, 2020, 1:47 PM IST

Updated : Aug 9, 2020, 5:36 PM IST

  • मुंबई - कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले आहे. त्यांचे पार्थिव सहार विमानतळावरील एअर इंडियाच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती मिळत आहे. केरळच्या कोझिकोड विमानतळावर झालेल्या विमान अपघातात वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला होता.

सविस्तर वाचा - कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव मुंबईत दाखल

  • मुंबई - नऊ ऑगस्ट १९४२मध्ये चले जावचाा त छोडो आंदोलनाचा पाया रचला गेला, यामुळे इतिहासात हा दिवस क्रांती दिवस म्हणून समजला जातो. याच दिवशी महात्मा गांधींनी अन्य नेत्यांना एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्य समरात सामील होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, या दिवसाच्या एक दिवसआधी ८ ऑगस्टला अखिल भारतील काँग्रस समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत भारत छोडोचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

सविस्तर वाचा - विशेष मुलाखत: गांधीजींचा 'चले जाव'चा नारा आणि क्रांतीदिनाची पार्श्वभूमी

  • नवी दिल्ली - केरळच्या कोझिकोड विमानतळावर झालेल्या विमान अपघातात वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला. आज दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर साठे यांना १०० पेक्षा जास्त वैमानिकांनी श्रद्धांजली वाहिली.

सविस्तर वाचा - दीपक साठे यांना वैमानिकांनी दिल्ली विमानतळावर वाहिली श्रद्धांजली

  • मुंबई - कोविड टेस्ट करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पहिल्या पॅथॉलॉजी लॅबच उद्घाटन नुकतंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून कोविड टास्क फोर्समधील काही मान्यवर डॉक्टरांनी कोविड चाचणीसह उपचारासाठी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करता येऊ शकतो का? याची चाचपणी करायची विनंती राज्य शासनाला केली होती.

सविस्तर वाचा - कोविड टेस्ट करण्यासाठी आता होणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर

  • मुंबई- देशातील कोरोनाचा कहर आटोक्यात येत नसताना या विषाणूमुळे कोरोना योध्यांनाही जीव गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 196 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही बाब धक्कादायक आणि चिंताजनक आहे.

सविस्तर वाचा - धक्कादायक..! आयएमएच्या 196 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू, पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

  • जळगाव - मराठी अस्मितेसंदर्भात कर्नाटक सरकारची नेहमीच दुटप्पी भूमिका राहिली आहे. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हटवून कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा आपली पातळी सिद्ध केली आहे.

सविस्तर वाचा - गुलाबराव पाटलांचं कर्नाटक सरकारवर टीकास्त्र

  • पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरामध्ये रात्रभर घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती झाली. यामुळे झालेल्या भीषण स्फोटात एका मृत्यू तर 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली अशी माहिती अग्निशामक दलाच्या विभागाने दिली आहे.

सविस्तर वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅसगळती होऊन भीषण स्फोट; एकाचा मृत्यू तर 12 जण जखमी

  • ठाणे - बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ववत बसवा, या मागणीचे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर असून कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील याचा गांभिर्यानं विचार करतील असा आशावाद देखील शिंदे यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा - छत्रपती शिवाजी महारांजा पुतळा पूर्ववत बसवा; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

  • जळगाव - नारायण राणे यांनी 'नाणार' प्रकल्पाबाबत शिवसेनेवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात, असे लाबराव पाटील यांनी म्हटले

सविस्तर वाचा - राणेंना काही कामधंदा उरलेला नाही - गुलाबराव पाटील

  • कोलंबो - विश्वकरंडक विजेत्या इंग्लंड संघाचा गोलंदाज लियाम प्लंकेट आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी यांच्यासह एकूण ९३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू लंका प्रीमियर लीगमध्ये (एलपीएल) भाग घेणार आहेत. एलपीएलचा पहिला हंगाम २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

सविस्तर वाचा - लंका प्रीमियरमध्ये खेळणार विश्वकरंडक विजेत्या संघाचा खेळाडू

Last Updated : Aug 9, 2020, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.