ETV Bharat / bharat

top 10@ 5 PM : सायंकाळी पाचपर्यंतच्या बातम्या... - टॉप टेन न्यूज

राज्य, देश, विदेशातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर...

top 10 news
top 10 news
author img

By

Published : Aug 20, 2020, 4:55 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करणारे महाराष्ट्र पोलीस दलाचे कोरोना योध्येही कोरोनाचे बळी ठरताना दिसत आहेत. आतापर्यंत राज्यात 131 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

वाचा सविस्तर - राज्यात कोरोनामुळे 131 पोलिसांचा मृत्यू; 10,492 पोलीस कोरोनामुक्त

नवी दिल्ली - देशातील स्वच्छता सर्वेक्षण-2020 मध्ये पुन्हा इंदूर विजयी झाले आहे. सलग चौथ्यांदा इंदूर शहराने पहिला क्रमांक पटकावला. देशातील सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून आज मध्य प्रदेशमधील इंदूरची घोषणा करण्यात आली. तर गुजरातमधील सूरत हे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. हरदीप सिंग पुरी यांनी टि्वटच्या माध्यमातून स्वच्छता सर्वेक्षण-2020 ची घोषणा केली.

सविस्तर वाचा - स्वच्छता सर्वेक्षण - 2020 : देशात इंदूर सर्वांत स्वच्छ शहर; तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

अहमदनगर - राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. शिक्षित बेरोजगारांना काम नाही. अनेक कोरोनाबाधितांना उपचार मिळत नाहीत. मात्र, एका अभिनेत्याच्या प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

सविस्तर वाचा - 'अभिनेता गेल्यावर जितकी चर्चा झाली, तितकी दूध आणि उसाबद्दल झाली असती तर...'

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष भाजप वेळोवेळी अनेक टीका करत असल्याचे पाहायला मिळते, यावर सरकारमधील मंत्री देखील जशास तसं उत्तर देतात. यामध्ये आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात नव्या ट्रान्सफर मंत्रालयाची स्थापना झाली असल्याची खोचक टीका ट्विटरवरुन सरकारवर केली आहे.

सविस्तर वाचा - 'ट्रान्सफर मंत्रालय..! महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना'

मुंबई - चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरू असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली. ही मुदत उद्या २१ ऑगस्टला संपणार होती.

सविस्तर वाचा - विद्यार्थ्यांना दिलासा..! आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सांगली - 'राजू शेट्टींप्रमाणे मला सरड्या सारखा रंग बदलता येत नाही,' अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे. तसेच 'आमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच तुम्ही आमदार आणि खासदार झालात,' असा टोलाही खोत यांनी लगावला. दूध दरावरून सोलापूरमध्ये राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला खोतांनी इस्लामपूरमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले.

सविस्तर वाचा - मला राजू शेट्टींप्रमाणे सरड्या सारखा रंग बदलता येत नाही - सदाभाऊ खोत

मुंबई - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच 'सद्भावना' दिवसानिमित्त उपस्थितांना प्रतिज्ञाही दिली.

सविस्तर वाचा -मुख्यमंत्री ठाकरे यांचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सातारा - प्रो कबड्डीमुळे मैदानावरील निदान रेषा सर्वपरिचित झाली. सामन्याची गतिमानता या रेषेमुळे वाढली. साखळी करून घेरू पाहणाऱ्याच्या खांद्यावरून मारलेली हनुमान उडी पाहिल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. कबड्डी क्षेत्राला ही देणगी डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून मिळाली आहे. होय, डाॅ. नरेंद्र अच्युत दाभोलकर! डाॅ. दाभोलकर हे उत्कृष्ट कबड्डीपटू होते, याशिवाय ते आट्यापाट्या व खोखो हे खेळही चांगले खेळायचे. हे साताऱ्याबाहेर फार कमी लोकांना माहिती आहे. सात शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू देणाऱ्या साताऱ्याच्या शिवाजी उदय मंडळाचे ते खेळाडू. या सातपैकी उत्कृष्ट खेळाडू व उत्तम संघटक, असे दोन पुरस्कार डाॅक्टरांच्या नावावर आहेत.

सविस्तर वाचा - नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन : 'त्यांनी' मारलेली हनुमान उडी म्हणजे...सहकाऱ्यांनी दिला आठवणींना उजाळा

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगडमधील बांसा गाव येथे दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना आझमगडच्या बॉर्डरवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी डॉ. नितीन राऊत यांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा - महाराष्ट्राच्या उर्जामंत्र्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई - मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं 17 ऑगस्टला अमेरिकेतील न्यू जर्सी इथे निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीताची कधीही भरुन येणार नाही अशी हानी झाली आहे. पंडितजी आपल्यातून गेले असले तरीही ते जिथे कुठे असतील तिथून कायम उत्तम संगीताला दाद देत राहतील, अशी प्रतिक्रिया भजन सम्राट अनुप जलोटा यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा - 'पंडित जसराज जिथे असतील तिथून उत्तम संगीताला दाद देत राहतील'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.