ETV Bharat / bharat

तृणमूल काँग्रेसला खिंडार, पुन्हा एका आमदाराचा तृणमूलला रामराम - Silbhadra Datta latest news

तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता ब‌ॅनर्जी यांना पुन्हा एक धक्का बसला आहे. आज आमदार शिलभद्र दत्त यांनीही तृणमूलला रामराम ठोकला आहे.

शिलभद्र दत्त
शिलभद्र दत्त
author img

By

Published : Dec 18, 2020, 2:02 PM IST

Updated : Dec 18, 2020, 3:29 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता ब‌ॅनर्जी यांना पुन्हा एक धक्का बसला आहे. आज आमदार शिलभद्र दत्त यांनीही तृणमूलला रामराम ठोकला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वी तृणमूल काँग्रेसेचे वरिष्ठ नेते दीप्तांग्शु चौधरी यांनीही दक्षिण बंगाल राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

तृणमूल काँग्रेसला गळती लागली असून अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम करत आहेत. हे नेते भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. बुधवारी तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर इतर आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरवात केली आहे.

भाजपाचा दावा खरा ठरतोय ?

तृणमूल काँग्रेसचे किमान पाच खासदार भाजपमध्ये दाखल होण्यास तयार आहेत. ते कोणत्याही वेळी राजीनामा देऊ शकतात, असा दावा पश्चिम बंगालमधील बॅरेकपूरचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले अर्जुन सिंह यांनी केला होता. सुवेंदू अधिकारी, दीप्तांग्शु चौधरी, शिलभद्र दत्त यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचा दावा खरा ठरत असल्याचे दिसत आहे.

पश्चिम बंगाल निवडणूक -

भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - "श्रीलंकेच्या ताब्यात असणाऱ्या ३६ भारतीयांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करा"; पलानीस्वामींची मोदींना विनंती

Last Updated : Dec 18, 2020, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.