ETV Bharat / bharat

'वाघ विधवां'ची करुण कहाणी, सुंदरबनच्या जंगलातील भयाण वास्तव - widows in sundarbans news

सुंदरबनच्या जंगलातील वाघांनी आत्तापर्यंत अनेकांचे बळी घेतले. उपजीविकेचे दूसरे साधन नसल्याने ग्रामस्थांना जंगलावर अवलंबून राहावे लागते. जंगलात जाऊन लाकूड गोळा करण्यासह इतर काम सहसा पुरुष करतात. त्यामुळे वाघाचा सामना झालाच तर पुरुषाचांच जीव जातो. वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या ही खूप जास्त आहे.

वाघहल्ले मृत्यू आणि 'वाघ विधवा',
वाघहल्ले मृत्यू आणि 'वाघ विधवा',
author img

By

Published : Oct 7, 2020, 6:11 AM IST

सुंदरबन (पश्चिम बंगाल) - सुंदरबनमधल्या हजारो स्त्रियांना वाघाच्या हल्ल्यामुळे वैधव्य आले आहे. पूर्व भारतातला चार हजार दोनशे चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला हा खोऱ्याचा प्रदेश जगातल्या सर्वात मोठ्या खारफुटी आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या जंगलातील वाघ हे या परिसरातील ग्रामस्थांचा कर्दनकाळ ठरत आहेत.

वाघहल्ले मृत्यू आणि 'वाघ विधवा'

सुंदरबनच्या जंगलातील वाघांनी आत्तापर्यंत अनेकांचे बळी घेतले. आपल्या रोजच्या गरजा आणि उपजीविकेचे दूसरे साधन नसल्याने त्यांना जंगलावर अवलंबून राहावे लागते. जंगलात जाऊन नदीतील मासे, खेकडे धरण्याचे किंवा मध, लाकूड गोळा करण्याचे काम सहसा पुरुष करतात. त्यामुळे वाघाचा सामना झालाच तर पुरुषाचांच जीव जातो. त्यात जर का माणसांचा जंगलाच्या कोअर भागात मृत्यू झाला असेल तर परिस्थिती आणखी बिकट होते. कारण गावकऱ्यांना त्या भागात प्रवेश नाही, त्यामुळे कित्येक लोकांचे मृतदेहदेखील सापडले नाहीत. वाघांचे हल्ले आणि ग्रामस्थांचा मृत्यू हे आता रोजचेच झाले आहे.

या भागात वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची आकडेवारी आणि विधवांची संख्या ही वाढतच आहे. या महिलांना 'टायगर विधवा' किंवा वाघ विधवाही म्हणतात. घरचा कर्ता पुरुष गेल्याने घरातील माणसांची जबाबदारी त्यांच्या विधवांवर येऊन पडली आहे. या भागात जंगालाशिवाय उपजिवीकेचे दूसरे साधन नसल्याने ग्रामस्थ हतबल आहेत. कुटुंबाचं पोट भरायच असेल तर जीव मुठीत घेऊन जंगलाची वाट धरावीच लागते, अशी येथील परिस्थिती आहे. याबाबत शासनाकडेही अनेक पाठपुरावे करण्यात आले. मात्र, प्रशासकीय अधिकारी वेगवेगळी कारणे सांगून ग्रामस्थांच्या समस्येकडे कानाडोळा करत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती कधी बदलणार, वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई तसेच येथील विधवा महिलांना विधवा पेंशनसारख्या सुविधा कधी मिळणार, प्रशासन त्यांचे म्हणणे ऐकणार का, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत येथील ग्रामस्थ आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.