श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी आई आणि तिच्या मुलीसह तीन महिला रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत सापडल्या. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी तहसीलमधील लारी गावात तीन महिला मृत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - मोदींचा व्हॅक्सीन दौरा...! सीरम, झायडस आणि भारत बायोटेक कंपनीला मोदींची भेट
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना झाली असावी, असे अहवालात म्हटले आहे. परंतु, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस पथक गावाकडे निघाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - लेहमध्ये पारा शून्याच्या 12.9 अंश खाली, जम्मू-काश्मीरमध्येही तापमान घसरले