ETV Bharat / bharat

विरोधकांना धक्का! आंध्र आणि तेलंगणातील ३ टीडीपी, २ काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेश

टीडीपी नेते ई पेड्डी रेड्डी, बोडे जनार्धन आणि सुरेश रेड्डी तर, काँग्रेस नेते शशीधर रेड्डी आणि रहमतुल्लाह शेख यांनी भाजप नेते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

टीडीपी नेत्यांचा भाजप प्रवेश
author img

By

Published : Jun 27, 2019, 5:30 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांना आणखी एक धक्का बसला आहे. तेलुगु देसम पक्षाचे ३ तर, काँग्रेसच्या २ नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

टीडीपी नेते ई पेड्डी रेड्डी, बोडे जनार्धन आणि सुरेश रेड्डी तर, काँग्रेस नेते शशीधर रेड्डी आणि रहमतुल्लाह शेख यांनी भाजप नेते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. टीडीपी प्रवक्ता लंका दिनाकर यांच्या भाजपप्रवेशानंतर विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी दिनाकर यांनी कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता.

याआधीही टीडीपीचे राज्यसभा खासदार वायएस चौधरी, सीएम रमेश, टी जी व्यंकटेश (आंध्रप्रदेश) आणि जी मोहन राव (तेलंगणा) यांनी जे पी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आंध्रप्रदेशमध्ये तेलुगु देसम पक्षाला मोठा धक्का बसला होता. सत्तेत असलेल्या टीडीपीला विधानसभेत १७५ पैकी केवळ २३ जागांवर तर, लोकसभेत २५ पैकी फक्त ३ जागांवर विजय मिळवता आला होता. यानंतर, पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.