विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यात एक कमांडर आणि दोन माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांनी कमांडर बोनंगी नागेश्वर राव आणि दोन माओवाद्यांना रिमांडवर पाठवले आहे.
बोनंगी नागेश्वर राव हा 2005 पासून कमांडर म्हणून काम करत आहे. खून, स्फोट आणि खंडणीच्या इतर अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. अटक करण्यात आलेल्या इतर दोन माओवाद्यांची नावे जी. राचंद्र पासल आणि एस. अप्पाराव अशी आहेत. हे दोघेही परिसरातील सरकारी अधिकारी व ग्रामस्थांना धमकावत असत, असे पोलिसांनी सांगितले.