कोलकाता - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या कोलकाता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाची लागण झालेले तीन्ही डॉक्टर हे 62 वर्षांच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णावर उपचार करत होते. संबधीत रुग्णाला किडनी त्रास होत असल्याने चारनॉक रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, एका रुग्णांचा डायलिसिस केल्यानंतर मृत्यू झाल्याने चारनॉक रुग्णालय तात्पुरते बंद करण्यात आले. त्यानंतर रुग्णाला केएमसीएचच्या वैद्यकीय वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते.
14 एप्रिलला रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांनतर आधिकाऱ्यांनी केएमसीएचच्या पुरुष व महिला औषध प्रभागात प्रवेश थांबविला होता. तसेच डॉक्टर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.