ETV Bharat / bharat

घराला आग लागून एका महिलेसह तीन लहानग्यांचा मृत्यू; एक गंभीर

लाईट नसल्यामुळे रिंकी खातून या मेणबत्ती लाऊन झोपल्या होत्या. या मेणबत्तीमुळे घराला आग लागली. यानंतर संपूर्ण घरानेच पेट घेतल्यामुळे मौसमी खातून (८), अजमेरी खातून (३) आणि मोहम्मद अयूब खातून (७ महिने) यांच्यासह रिंकी खातून (३०) यांचा मृत्यू झाला...

Three children burnt to death in Bihar village fire
घराला आग लागून एका महिलेसह तीन लहानग्यांचा मृत्यू; एक गंभीर
author img

By

Published : Oct 13, 2020, 12:37 PM IST

पाटणा : बिहारच्या कटिहारमध्ये घराला आग लागल्यामुळे एका महिलेसह तीन लहान मुलांचा मृत्यू झाला. तसेच, एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. सोमवारी रात्री उशीरा ही दुर्घटना घडली.

घराला आग लागून एका महिलेसह तीन लहानग्यांचा मृत्यू; एक गंभीर

मेणबत्तीमुळे लागली आग..

मिळालेल्या माहितीनुसार, लाईट नसल्यामुळे रिंकी खातून या मेणबत्ती लाऊन झोपल्या होत्या. या मेणबत्तीमुळे घराला आग लागली. यानंतर संपूर्ण घरानेच पेट घेतल्यामुळे मौसमी खातून (८), अजमेरी खातून (३) आणि मोहम्मद अयूब खातून (७ महिने) यांच्यासह रिंकी खातून (३०) यांचा मृत्यू झाला. तसेच आणखी एक महिला जखमी झाली आहे. या महिलेला रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलीस याबाबत शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : उत्तर प्रदेश - तीन दलित बहिणींवर अ‌ॅसिड हल्ला; कारण अस्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.