ETV Bharat / bharat

लुटीचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय खेळाडूसह तिघांना अटक - दिल्ली क्राईम न्यूज

लुटीचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय खेळाडूसह तिघांना अटक केली आहे. नौकायन या खेळ प्रकारातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूने मित्राच्या घराची कागदपत्रे एका असलम नावाच्या जागेचे खरेदी व्यवहार बघणाऱ्या दलालास देण्यासाठी कट रचला होता. या बदल्यात त्या दलालाकडून संजयला ६ लाख रुपये मिळणार होते.

लुटीचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय खेळाडूसह तिघांना अटक

author img

By

Published : Oct 31, 2020, 9:54 AM IST

नवी दिल्ली - लुटीचा कट रचल्याप्रकरणी एका राष्ट्रीय स्तरावरील नौकायन या खेळ प्रकारातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूसह तिघा जणांना पोसिलांनी अटक केली आहे. संजय असे त्या आरोपीचे नाव असून या आरोपी खेळाडूला २ वेळा सुवर्ण पदक मिळाले आहे. मित्राला लुटण्यासाठी संजयने कट रचला होता. संजय यापूर्वी सीआरपीएफमध्ये पोलीस उपनिरक्षक होता. मात्र, त्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्याच्यावर मित्राच्या घराचे कागदपत्र लुटण्यासंदर्भातील गुन्हा दाखल आहे.

तिमारपूर परिसरातील २७ तारखेला चाकूहल्ला करून लुटीची घटना घडली होती. त्या घटनेच्या तपासात संजयने मित्राच्या घराची कागदपत्रे एका असलम नावाच्या जागेचे खरेदी व्यवहार बघणाऱ्या दलालास देण्यासाठी कट रचला होता. या बदल्यात त्या दलालाकडून संजयला ६ लाख रुपये मिळणार होते. प्लॉट दाखवण्याचा बहाणा करत कागदपत्रे घेऊन जाताना लुटीच्या डाव साधण्यात आला होता. त्यानंतर तपासा अंती हा कट रचण्यात संजय याचाही हात असल्यचे समोर आले. पोलिसांनी कागदपत्रे हस्तगत केली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अन्य दोघांनाही अटक केली आहे.

लुटीचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय खेळाडूसह तिघांना अटक
लुटीचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय खेळाडूसह तिघांना अटक

या घटनेची अधिक माहिती अशी की 45 वर्षीय वृंदावन आजादपूर येथील भाजी मार्केटमध्ये भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. ते त्यांच्या कुटुंबीयासह भलस्वा डेअरी परिसरात वास्तव्याला आहेत. वृंदावन यांनी असलम नावाच्या या जमिनीचे व्यवहार करणाऱ्या दलालाकडून 14 लाख रुपयांचा एक प्लॉट भलस्वा परिसरात खरेदी केला होता. मात्र, असलम त्यांना त्यांच्या प्लॉटचा ताबा देत नाव्हता आणि पैसे परत द्यायला तयार नव्हता.

असलमने प्लॉटच्या कागदपत्रांच्या बदल्यात खेळाडू संजयला सहा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पीडित आणि संजय हे कागदपत्रे घेऊन आजादपूरहून मुखर्जी नगरकडे जात होते. त्यावेळी तिमारपूर परिसरात आले असता, दुचाकीवर आलेल्या गुडांनी वृदांवनवर हल्ला करून जमिनीची कागदपत्रे घेऊन घटनास्थळावरून पळ काढला,

कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन-

या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. त्यावेळी सायबर विभागाचीही मदत घेण्यात आली. यामध्ये पोलिसांनी पीडित वृंदावन आणि संजयचे कॉल डिटेल्स आणि मोबाइल लोकेशनची माहिती घेतली. त्यावेळी पोलिसांना लक्षात आले की संजय या ठिकाणी यापूर्वीही गेला होता. त्यानंतर त्याच्या कॉल डिटेल्स तपासल्या असता, पोलिसांना संजयवर शंका आली आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू असलेल्या संजयने स्वत:चा गुन्हा कबूल केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.