नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्लीतील नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज दिमाखात पार पडला. यावेळी ८ हजार जण या कार्यक्रमाला उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर त्यांच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मंत्र्यांना शपथ दिली.
दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. सर्वप्रथम नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर माजी गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शाह, माजी रस्ते वाहतूक व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासह प्रमुख नेत्यांनी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळातील ही आघाडीची फळी असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली.
या शपथविधी सोहळ्यात एकून ५८ मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी देशातील तसेच विदेशांतील राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली.
मोदी मंत्रिमंडळातील २४ कॅबिनेट मंत्र्यांची नावे
1) राजनाथ सिंग
2) अमित शाह (पहिल्यांदाच मंत्रिमंडळात)
3) नितीन गडकरी
4) सदानंद गौडा
5) निर्मला सितारामन
6) रामविलास पासवान
7) नरेंद्र सिंग तोमर
8) रवी शंकर प्रसाद
9) हरसिमरत कौर बादल
10) थावरचंद गेलहोत
11) एस जयशंकर
12) रमेश पोखरियाल (पहिल्यांदाच मंत्रिमंडळात)
13) अर्जुन मुंडा
14) स्मृती इराणी
15) डॉ. हर्षवर्धन
16) प्रकाश जावडेकर
17) पीयूष गोयल
18) धर्मेंद्र प्रधान
19) मुख्तार अब्बास नक्वी
20) प्रल्हाद जोशी (पहिल्यांदाच मंत्रिमंडळात)
21) महेंद्रनाथ पांडे
22) अरविंद गणपत सावंत (शिवसेना)
23) गिरीरीज सिंग
24) गजेंद्र सिंग शेखावत
मोदी मंत्रिमंडळातील राज्यमंत्री
1) संतोष कुमार गंगवार
2) राव इंद्रजित सिंग
3) श्रीपाद नाईक
4) डॉ. जितेंद्र सिंग
5) किरण रिजिजु
6) प्रल्हादसिंह पटेल
7) राजकुमार सिंह
8) हरदिपसिंग पुरी
9) मनसुख मांडविय
10) फग्गनसिंह कुलस्ते
11) अश्विनीकुमार चौबे
12) अर्जुन राम मेघवाल
13) जनरल (निवृत्त) व्ही. के सिंह
14) कृष्णपाल गुर्जर
15) रावसाहेब दानवे
16) जी. किशन रेड्डी
17) पुरुषोत्तम रुपाल
18) रामदास आठवले
19) साध्वी निरंजण ज्योती
20) बाबुल सुप्रियो
21) संजीव कुमार बलियान
22) संजय धोत्रे
23) अनुराग सिंग ठाकुर
24) अंगदी सुरेश चन्नाबसप्पा (पहिल्यांदाच मंत्रिमंडळात)
25) नित्यानंद राय
26) रतनलाल कटारिया
27) व्ही. मुरलीधरण
28) रेणुका सरुता
29) सोम प्रकाश (पहिल्यांदाच मंत्रिमंडळात)
30) रामेश्वर तेली (पहिल्यांदाच मंत्रिमंडळात)
31) प्रतापचंद्र सारंगी
32) कैलास चौधरी (पहिल्यांदाच मंत्रिमंडळात)
33) देवश्री चौधरी (पहिल्यांदाच मंत्रिमंडळात)