ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : हैदराबादमधील 'प्लांट फॉर प्लास्टिक अभियान' अन् 'टिफिन बॉक्स चॅलेंज'

आपल्या शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी तेलंगाणामधील एक सॉफ्टवेअर इंजिनिअरने 'प्लांट फॉर प्लास्टिक' अभियान सुरू केले आहे. यामध्ये तो लोकांना प्लास्टिकच्या बदल्यात झाडाचे एक रोपटे देतो. दोसापती रामू, असे या अभियंत्याचे नाव आहे.

This Hyderabad engineer gives a sapling in exchange for plastic
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : हैदराबादमधील 'प्लांट फॉर प्लास्टिक अभियान' अन् 'टिफिन बॉक्स चॅलेंज'..
author img

By

Published : Feb 4, 2020, 1:26 PM IST

हैदराबाद - तेलंगाणामधील एक सॉफ्टवेअर इंजिनिअर प्लास्टिकविरोधी लढा देत आहे आणि त्याच्या या लढ्याला आता बऱ्यापैकी यशही मिळताना दिसत आहे. आपल्या शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी त्याने 'प्लांट फॉर प्लास्टिक' अभियान सुरू केले आहे. यामध्ये तो लोकांना प्लास्टिकच्या बदल्यात झाडाचे एक रोपटे देतो. दोसापती रामू, असे या अभियंत्याचे नाव आहे.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : हैदराबादमधील 'प्लांट फॉर प्लास्टिक अभियान' अन् 'टिफिन बॉक्स चॅलेंज'

या अभियानासाठी पूर्व गोदावरी कडिया वरून हजारो रोपटी आणली गेली आहेत. कितीही प्लास्टिक आणून त्या बदल्यात तुम्ही यातील एक रोपटे घेऊन जाऊ शकता. कारण रामूने अमूक-अमूक प्रमाणातच प्लास्टिक आणावे अशी कोणतीही अट ठेवली नाही. खरंतर तुम्ही केवळ एका चिप्सच्या पाकिटाच्या बदल्यातही एक रोपटे घेऊन जाऊ शकता. हे गोळा केलेले प्लास्टिक तो नंतर स्वखर्चाने हैदराबाद महानगरपालिकेमध्ये जमा करतो.

प्लास्टिकमुक्तीच्या आपल्या स्वप्नासाठी रामूने आणखी एक अभियान हाती घेतले आहे. ते म्हणजे, 'टिफिन बॉक्स चॅलेंज'. यामध्ये तो लोकांना बाजारातून मटण खरेदी केल्यानंतर ते नेण्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक ऐवजी स्टीलचा डब्बा वापरण्याची विनंती करत आहे.

सुरुवातीला त्याने आपल्या मित्रांना हे चॅलेंज दिले. मित्रांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तो बाहेर जाऊन लोकांना त्याबाबत सांगत आहे. शहरातील मटण विक्रेत्यांनाही तो याबाबत सांगत आहे. मात्र, अद्याप तरी मटण विक्रेते हे चॅलेंज स्वीकारताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक : हैदराबादमध्ये सुरू झालं 'झीरो वेस्ट इको स्टोअर'

Intro:Body:

Plastic story for February 4th

today's gfx, upload both english and unmix

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.