ETV Bharat / bharat

भाजपचा 'हा' दिग्गज नेता यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही; अन्य नेत्यांवरही जनतेचा डोळा - leader

७५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांनी निवडणूक लढवावी की नाही यावर निर्णय करण्यास भाजपने सांगितले होते. त्यानंतर मिश्रा यांनी हा निर्णय घेतला आहे.

कलराज मिश्रा हे उत्तर प्रदेशच्या देवरिया येथून खासदार आहेत.
author img

By

Published : Mar 21, 2019, 8:43 PM IST

Updated : Mar 21, 2019, 11:23 PM IST

लखनौ - भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. होळीच्या पावन पर्वावरच त्यांनी याची घोषणा केली आहे. पक्षामध्ये मोठ्या जबाबदाऱ्या असल्यामुळे आपण निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ७५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांनी निवडणूक लढवावी की नाही यावर निर्णय करण्यास भाजपने सांगितले होते. त्यानंतर मिश्रा यांनी हा निर्णय घेतला आहे.

कलराज मिश्रा हे उत्तर प्रदेशच्या देवरिया येथून खासदार आहेत. त्यांनी होळीलाच आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. पक्षाने आपल्यावर मोठ्या जबाबादाऱ्या दिल्या आहेत. त्यांना पूर्ण करण्यासाठी मी स्वतःचा वेळ देणार, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. मिश्रांच्या निर्णयानंतर आता देशाचे लक्ष लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि शांता कुमार सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर लागले आहे.

कलराज मिश्रा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केल्यानंतर आठच वर्षात संघाचे पूर्णकालिक प्रचारक झाले होते. ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष होते. १९७८, २००१ आणि २००६ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य होते. पक्ष आणि सरकारमध्ये स्थानिक किंवा राष्ट्रीय स्तरावर त्यांनी मोठे पद गाजवले आहेत. त्यांना संगठन निर्माण प्रक्रियेत 'माहिर' मानले जाते. २०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकून ते खासदार झाले. त्यावेळी त्यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.

भाजप आज किंवा उद्या लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पंतप्रधान मोदी हे वाराणसी येथून निवडणूक लढवणार, असे म्हटले जात आहे. मात्र, यादी जाहीर झाल्यानंतरच कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल.

Intro:Body:

भाजपचा 'हा' दिग्गज नेता यंदाची लोकसभा निडवणूक लढवणार नाही; अन्य नेत्यांवरही जनतेचा डोळा

Conclusion:
Last Updated : Mar 21, 2019, 11:23 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.