बासवाडा (राजस्थान) - तबलिगी जमातशी संबंधित एका दाम्पत्याला बासवाडा मध्यप्रदेशच्या सीमेवर अडवण्यात आले. तेथूनच त्यांना विलगीकरण कक्षात नेण्यात आले. यावरून प्रशासन आपल्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे कोणतेही विलगीकरण केंद्रात राहिल्याचे पुरावे नव्हते आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला विलगीकरणाचे नियम लागू असतील, असे म्हटले आहे.
जिल्ह्यातील रहिवासी मोईन खान आणि त्यांची पत्नी 15 मार्चला दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित मरकज जमातमध्ये सहभागी झाले होते. तेथे दोन दिवस थांबून जयपूरच्या जमात बरोबर मध्यप्रदेशमधील दतिया येथे गेले. तेथे हे दाम्पत्य सात दिवस राहिले. त्यानंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर त्यांना दतियामध्ये विलगीकरण ठेवण्यात आले. 1 एप्रिलला दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, त्यांना विलगीकरणात काही दिवस ठेवण्यात आले. 28 दिवस विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून ड्रायव्हरसोबत बासवाडाला जाण्यासाठी आम्ही रवाना झालो. मात्र, येथे सीमेवर आम्हाला अडवण्यात आले. विलगीकरण कक्षातही आम्हाला वेगळे ठेवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्याचे कोणतेही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांना आम्हाला विलगीकरणात ठेवावे लागले. जिल्हावासियांच्या खबरदारी खातर आपण कोणताही धोका घेऊ शकत नाही आणि त्यांच्याशी भेदभाव करण्याचा संबंध नाही, इतरांच्या प्रमाणेच त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे यावर जिल्हा प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले आहे.