नवी दिल्ली : देशातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा परदेशातील अनेक सेलिब्रिटींनीही उचलला आहे. यावरही मोदींनी तिरकस निशाणा साधला आहे. हा नवा एफडीआय असून देशाला यापासून वाचविले पाहिजे असे मोदींनी म्हटले आहे.
हा नवा एफडीआय
फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटऐवजी फॉरेन डिस्ट्रक्टिव्ह आयडियॉलाजी हा एक नवा एफडीआय अलिकडे उदयास आला आहे. या एफडीआयच्या माध्यमातून देशवासियांची दिशाभूल केली जात आहे. यापासून देशाला वाचविले पाहिजे असा टोला मोदींनी मारला.
रिहाना, ग्रेटा थनबर्गने केले होते ट्विट
देशातील शेतकरी आंदोलनाविषयी पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर परदेशातील अनेक सेलिब्रिटींनी हा विषय उचलून धरला होता. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही याची दखल घेतली होती. यानंतर देशातील सेलिब्रिटींनी हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत #IndiaAgainstPropaganda ही मोहिम ट्विटरवर चालविली होती. यावरून सोशल मीडियात बरीच राळ उठली. यावरच मोदींनी भाषणातून निशाणा साधला आहे.