ETV Bharat / bharat

'जमावाकडून एका तरुणाची हत्या होणे हा मानवतेवरील कलंक'; राहुल गांधी यांचे ट्विट - young man

मोटारसायकलची चोरी केल्याच्या आरोपावरून झारखंडमधील तबरेज अन्सारी या बावीस वर्षीय तरुणाची जमावाकडून मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. या मारहाणीत तरुणाचा रविवारी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निषेध व्यक्त केला आहे.

तबरेज अन्सारी
author img

By

Published : Jun 26, 2019, 8:02 AM IST

Updated : Jun 26, 2019, 9:36 AM IST

नवी दिल्ली - मोटारसायकलची चोरी केल्याच्या आरोपावरून झारखंडमधील तबरेज अन्सारी या बावीस वर्षीय तरुणाची जमावाकडून मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. या मारहाणीत तरुणाचा रविवारी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निषेध व्यक्त केला आहे.

'जमावाकडून एका तरुणाचा क्रूर छळ करण्यात येतो. अशी घटना होणे म्हणजे मानवतेवर कलंक आहे. क्रेंद्रात आणि राज्यात भाजपचा आवाज कणखर आहे. तरीही या घटनेवर केंद्र आणि राज्य सरकार शांत आहे. याचबरोबर जखमी तरुणाला चार दिवस ताब्यात ठेवणाऱ्या पोलिसांचा क्रूरपणा हा देखील धक्कादायक आहे', असे राहुल गांधी यांनी टि्वट करुन म्हटले आहे.

  • The brutal lynching of this young man by a mob in Jharkhand is a blot on humanity. The cruelty of the police who held this dying boy in custody for 4 days is shocking as is the silence of powerful voices in the BJP ruled Central & State Govts. #IndiaAgainstLynchTerror pic.twitter.com/4MKvli1ohC

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोटारसायकलची चोरी केल्याच्या आरोपावरून एका बावीस वर्षीय तरुणाला हल्लेखोरांनी वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केली. झारखंड येथील सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील धाटकीडीह गावात ही घटना घडली आहे.
मारहाणी दरम्यान त्याला 'जय श्रीराम' आणि 'जय बजरंगबली' असे म्हणायला सांगितले होते, अशी माहिती आहे.

या घटनेनंतर तरबेजला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 22 जूनला त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर 11 जणांना ताब्यात घेतले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 26, 2019, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.