ETV Bharat / bharat

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या 'ब्लिट्झक्रिग' युद्धनीतीनं मित्र राष्ट्रांना फोडला होता घाम

ब्लिट्झक्रिग युद्धनितीचा वापर करुन जर्मनीने युरोमधील अनेक राष्ट्रांना धुळ चारली. वेग, अचुकता, सैन्य दलातील ताळमेळ आणि योग्य नियोजन ही या नितीची महत्त्वाची वैशिष्ये आहेत. युद्धाच्या सुरुवातीला हिटलरच्या सैन्याच्या हल्ला करण्याची पद्धतीने शत्रुला बुचकाळ्यात टाकले.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 2, 2020, 6:32 AM IST

हैदराबाद - दुसरे महायुद्ध १९३९ ते १९४५ च्या दरम्यान मुख्यता युरोप आणि आशियाई धरतीवर झालेले नरसंहारक युद्ध होते. या युद्धात सुमारे ६ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. तर लाखो जखमी झाले. आज(२ सप्टेंबर) या युद्धाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. पहिल्या महायुद्धातील व्हर्सायाच्या मानहानीकारण तहाचा बदला घेण्यासाठी जर्मनी पेटून उठला होता. जर्मनीने पोलंडवर १ सप्टेंबर १९३९ ला चढाई केली. अन् अधिकृतरित्या युद्धाला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने 'ब्लिट्झक्रिग' या युद्धनितीचा वापर केला. हा युद्ध पद्धतीनं मित्र पक्षाला सळो की पळो करुन सोडलं. काय होती ही युद्धनिती?

काय आहे ब्लिट्झक्रिग युद्ध निती?

ब्लिट्झक्रिग युद्धनितीचा वापर करुन जर्मनीने युरोमधील अनेक राष्ट्रांना धुळ चारली. वेग, अचुकता, सैन्य दलातील ताळमेळ आणि योग्य नियोजन ही या नितीची महत्त्वाची वैशिष्ये आहेत. युद्धाच्या सुरुवातीला हिटलरच्या सैन्याच्या हल्ला करण्याची पद्धतीने शत्रुला बुचकाळ्यात टाकले.

शत्रूच्या प्रदेशावर किंवा एखाद्या शहरावर हल्ला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने, रणगाडे आणि तोफांचा वापर करायचा. शत्रूच्या प्रदेशात एका चिंचोळ्या भागातून रणगाडे आणि आर्टिलरी तोफा असणाऱ्या वाहनांनी प्रवेश करुन जोरदार हल्ला चढवायचा. त्याचवेळी विमानांद्वारे शत्रुच्या सैन्यावर हल्ला चढवायचा. रणगाडे आणि आर्टिलरी वाहने सतत आपली जागा बदल मारा करत असल्याने नक्की हल्ला कोठून होतोय, याचा अंदाजही प्रतिपक्षाला लागत नाही. शत्रूला भांबावून सोडल्यानंतर त्यांना वेढा घालायचा आणि प्रदेश काबीज करायचा. ही युद्ध निती याआधी कोणीही वापरली नव्हती. त्यामुळे युद्धाच्या सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या हल्ल्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले.

पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या कैसर विल्यम-२ ला चार वर्ष युद्ध लढूनही जेवढा प्रदेश जिंकता आला नव्हता तेवढा प्रदेश हिटलरने १० मे ते २१ जून १९४० च्या दरम्यान जिंकला. ब्लिट्झक्रीग युद्ध नितीचा वापर करून जर्मनीने पोलंड, डेनमार्क, नॉर्वे, बेल्जियम, नेदंरलँड, लक्झेंमबर्ग, फ्रान्स, युगोस्लोव्हिया आणि ग्रीसचा पाडाव केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.