श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील दक्षिणेकडील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांच्या दरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाने अवंतीपोरा त्रालच्या सिमोह परिसराला वेढले होते. तिथे दहशतवादी लपून बसल्याच्या माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराची आरआर, सीआरपीएफची १८० बटालियन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवादी यांच्यात चकमत झाली. त्यात दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - दिल्लीत अडकलेल्या कामगारांच्या मदतीला धावली स्वरा भास्कर; बिहारी नागरिकांना पाठवले घरी