ETV Bharat / bharat

दहशतवाद्यांचे लपण्याचे अड्डे उद्धवस्त, दोन 'AK-47' रायफल जप्त

author img

By

Published : Aug 8, 2020, 7:05 AM IST

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवाद्यांचे लपण्याचे अड्डे सैन्य दलाकडून उद्ध्वस्त करण्यात आले. या ठिकाणावरून दोन AK-47 रायफल आणि चार मॅग्जीन जप्त करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीर
जम्मू काश्मीर

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांचे लपण्याचे अड्डे सैन्य दलाकडून उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय लष्कर व जम्मू-काश्मीर पोलिसांकडून संयुक्त शोध मोहिम राबवण्यात आली होती. पूंछ जिल्ह्यातील मंगनार शिखरावर दहशतवाद्याच्या लपण्याचे अड्डे होते. या ठिकाणावरून दोन AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे.

गुप्तचरांकडून आम्हाला दहशतवाद्यांचे लपण्याच्या अड्ड्याविषयी माहिती मिळाली होती. त्या आधारावर, स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) पूंछ आणि स्थानिक सैन्याच्या युनिटने शोधमोहीम सुरू केली. यावेळी मंगनारमधील कालसा वनक्षेत्रात एक संशयित जागा दिसली. त्या ठिकाणाची झडती घेतली असता, दोन एके-47 रायफल आणि चार मॅग्जीन आढळले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) रमेश अंगरल यांनी दिली.

हा भाग कुख्यात घुसखोरीचा मार्ग होता. आम्ही सामान्यत: या प्रकारच्या भागात शोधमोहीम सुरू करतो. एसओजीकडून यासंदर्भात चौकशी करण्यासाठी टास्क फोर्स तयार केला जाईल. तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल आणि माहितीनुसार शोधमोहिम राबवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारत पाकिस्तानदरम्यान झालेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू आणि 6 जण जखमी झाले होते. मोहम्मद अरिफ असे मृत नागरिकाचे नाव आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.