ETV Bharat / bharat

BREAKING: पुलवामात दहशतवादी हल्ला; एकाचा मृत्यू तर, दोन जवान जखमी - पुलवामात दहशतवादी हल्ला

जम्मूच्या पुलवामा जिल्ह्यात पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पोलीस दलाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी आहे.

pulwama attack
pulwama attackजम्मूच्या पुलवामा सेक्टर मध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आले आहे.
author img

By

Published : May 21, 2020, 3:28 PM IST

Updated : May 21, 2020, 3:55 PM IST

श्रीनगर - जम्मूच्या पुलवामा सेक्टरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पोलीस दलाचे अनुपम सिंग यांना वीरमरण आले असून अन्य दोघे जखमी आहे. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला चढवला.

प्रिछू परिसरात दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, त्यात दोन जवान जखमी झाले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एका जवानाला श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर जम्मू- काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

हुतात्मा झालेले अनुप सिंग हे आयआरपीच्या १० बटालीयनचे जवान असून मोहम्मद इब्राहीम नामक जवान जखमी अवस्थेत आहे. अद्याप त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हल्ला झालेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून त्या ठिकाणी सीआरपीएफ आणि लष्कराच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

Last Updated : May 21, 2020, 3:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.