हैदराबाद - अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर अस्थिरता झाली आहे. असे असले तरी भारतीयांनी वांशिक भेदभावाविषयी काळजी करण्याची गरज नसल्याचे नॉर्थ अमेरिकेतील तेलुगू संघटनेचे अध्यक्ष जय तल्लुरी म्हणाले आहेत.
जय तल्लुरी हे ई टीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की चार पोलिसांकडून जॉर्ज यांचा निर्दयी पद्धतीने खून करण्यात आला. ही खूप, खूप दुर्देवी घटना आहे. जॉर्ज याने मरताना मी श्वास घेऊ शकत नाही असे म्हटले होते. त्यानंतर अमेरिकेत 'आय कान्ट ब्रीथ' या नावाने आंदोलन सुरू झाले आहे.
काही लोकांनी अमेरिकेमधील दुकाने लुटण्यास सुरुवात केली आहे. अशा दुकाने लुटण्याच्या घटना 60 शहरांमध्ये घडल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सर्व दुकाने बंद आहेत. या परिस्थितीचा काही लोकांनी गैरफायदा घेतला आहे. अमेरिकन संघराज्याने सर्व अमेरिकेत सैन्यदल तैनात केले आहे. सर्व शहरांमध्ये आज रात्री सात वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार त्यांनी माहिती दिली.
पण, मला ती घटना स्वतंत्र वाटते. त्यामध्ये वांशिक भेदभाव नसल्याचे दिसत नाही. कारण इतरांनी काही केले नाही. चार पोलिसांनी वाईट कृत्य केले आहे. त्यांनी जॉर्ज याला रस्त्यावर ठार केले आहे.
ते पुढे म्हणाले, की आम्ही प्रत्येकाला जबाबदार ठरू शकत नाही. दुर्देवाने यापूर्वीही अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र, त्या स्वतंत्र घटना आहेत. त्याबाबत भारतीयांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. काही भारतीयांच्या मालकीचे दुकान लुटले असले, तरीही त्यांनी चिंता करू नये. कारण त्यांनी कुठेही भारतीयांना लक्ष्य केले नाही. अशा घटना 1980मध्येही घडल्या आहेत. 9/11च्या घटनेनंतर 2001मध्येही काही घटना घडल्या आहेत. आम्ही थोडे चिंतेत आणि घाबरलेलो आहोत. मात्र, भारतीयांविरोधात वांशिक भेदभाव असल्याचे कुठेही दिसत नाही, असे जय यांनी सांगितले.