ETV Bharat / bharat

तेलंगणात आज 56 कोरोनाग्रस्त आढळले; एकूण रुग्णसंख्या 928 - कोरोना संसर्ग

आज दिवसभरात सुर्यपेठ जिल्ह्यात 26 कोरोनाग्रस्त आढळून आले असून हैदराबाद शहरात 19 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले.

corona file pic
कोरोना संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 21, 2020, 11:25 PM IST

हैदराबाद - तेलंगणा राज्यामध्ये आज (मंगळवार) दिवसभरात 56 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 928 झाली आहे. यातील 711 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर 194 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

  • 56 more #COVID19 cases reported in Telangana today. Total number of cases in the state now at 928, including 711 active cases, 194 cured/discharged & 23 deaths: State Health Department pic.twitter.com/GpCsTr0UbO

    — ANI (@ANI) April 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिवसभरात सूर्यपेठ जिल्ह्यात 26 कोरोनाग्रस्त आढळून आले असून हैदराबाद शहरात 19 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 20 एप्रिलपासून राज्यामध्ये संचारबंदीत कोणतीही सूट दिली नाही. तसेच लॉकडाऊन 7 मेपर्यंत वाढविला आहे. घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांनी 18 हजारांचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत 18 हजार 601 रुग्ण आढळून आले असून 3 हजार 252 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. काल सोमवार) दिवसभरात 705 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 17.48 टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.