ETV Bharat / bharat

महिला घरी असतात म्हणून त्यांना मंत्रीपद नाही; टीआरएस मंत्र्याची मुक्ताफळे - TRS

मंत्र्यांनी जरी याप्रकारचे वक्तव्य केले असले तरी पक्ष याविषयी सहमत नाही, असे टीआरएसचे प्रवक्ते  अबिद रसूल खान यांनी सांगितले.

author img

By

Published : Feb 20, 2019, 9:28 PM IST

हैदराबाद - महिला घरी असतात, त्यामुळे त्यांना मंत्रीपद दिले नाही, असे वक्तव्य तेलंगणाचे मंत्री जी. जगदीश रेड्डी यांनी केले आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना का स्थान देण्यात आले नाही? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले. मंत्रीपद देण्यासाठी लिंग, जात, धर्म याचा विचार केला जाणार नाही, तर त्या पदासाठी योग्य असणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाईल, असे रेड्डी यांनी यापूर्वी म्हटले असल्याचे एका दैनिकाने म्हटले आहे.

मी एखाद्या मंत्र्याद्वारे केल्या जाणाऱया याप्रकारच्या वक्तव्याचा निषेध करतो. मंत्र्यांनी जरी याप्रकारचे वक्तव्य केले असले तरी पक्ष याविषयी सहमत नाही, असे टीआरएसचे प्रवक्ते अबिद रसूल खान यांनी सांगितले. टीआरएसमध्ये महिला नेत्यांबद्दल प्रचंड सन्मान आहे. मी आश्वासन देतो की राज्यातील महत्त्वाचे खाते महिलांच्या नेतृत्वात चालवण्यात येईल, असेही खान यांनी सांगितले. महिलांचा आम्हाला पाठिंबा आहे. राज्य सरकारच्या योजना महिलाकेंद्रित आहेत. तसेच आम्ही महिला सशक्तीकरणासाठी अनेक उपक्रम राबवतो, असेही खान यांनी स्पष्ट केले.

Intro:Body:

महिला घरी असतात म्हणून त्यांना मंत्रीपद नाही; टीआरएस मंत्र्याची मुक्ताफळे

हैदराबाद - महिला घरी असतात, त्यामुळे त्यांना मंत्रीपद दिले नाही, असे वक्तव्य तेलंगणाचे मंत्री जी. जगदीश रेड्डी यांनी केले आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना का स्थान देण्यात आले नाही? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले.

मंत्रीपद देण्यासाठी लिंग, जात, धर्म याचा विचार केला जाणार नाही, तर त्या पदासाठी योग्य असणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाईल, असे रेड्डी यांनी यापूर्वी  म्हटले असल्याचे एका दैनिकाने म्हटले आहे.

मी एखाद्या मंत्र्याद्वारे केल्या जाणाऱया याप्रकारच्या वक्तव्याचा निषेध करतो. मंत्र्यांनी जरी याप्रकारचे वक्तव्य केले असले तरी पक्ष याविषयी सहमत नाही, असे टीआरएसचे प्रवक्ते  अबिद रसूल खान यांनी सांगितले. टीआरएसमध्ये महिला नेत्यांबद्दल प्रचंड सन्मान आहे. मी आश्वासन देतो की राज्यातील महत्त्वाचे खाते महिलांच्या नेतृत्वात चालवण्यात येईल, असेही खान यांनी सांगितले. महिलांचा आम्हाला पाठिंबा आहे. राज्य सरकारच्या योजना महिलाकेंद्रित आहेत. तसेच आम्ही महिला सशक्तीकरणासाठी अनेक उपक्रम राबवतो, असेही खान यांनी स्पष्ट केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.