हैदराबाद - राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता मुख्यमंत्री के. आर राव यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. दोन आठवड्यांचा लॉकडाऊन वाढविण्याची विनंती राव यांनी आधीच पंतप्रधान मोदींकडे केली होती. ओडिशा, पंजाब, महाराष्ट्र राज्यानेही लॉकडाऊन एप्रिलच्या शेवटपर्यंत ठेवण्याची घोषणा केली आहे.
-
Lockdown in Telangana to be extended till April 30: Telangana CM K Chandrasekhar Rao pic.twitter.com/EQKbz8V9VK
— ANI (@ANI) April 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Lockdown in Telangana to be extended till April 30: Telangana CM K Chandrasekhar Rao pic.twitter.com/EQKbz8V9VK
— ANI (@ANI) April 11, 2020Lockdown in Telangana to be extended till April 30: Telangana CM K Chandrasekhar Rao pic.twitter.com/EQKbz8V9VK
— ANI (@ANI) April 11, 2020
संचारबंदी वाढविण्याचा पंतप्रधानांचा निर्णय योग्यच असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. मात्र, दिल्लीत संचारबंदी वाढविण्याची अधिकृत घोषणा केली नाही. पंतप्रधानांनी लॉकडाऊन वाढविण्याबद्दल चर्चा केली. त्यास आम्हीही अनूकूल आहोत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. महाराष्ट्र, तामिळानाडू आणि दिल्लीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत.
देशात मागील 24 तासांत 1 हजार 35 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर 40 जण दगावले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 7 हजार 529 झाली आहे. तर 242 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदींनी आज(शनिवार) विविध केंद्रशासित प्रदेश आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे.