ETV Bharat / bharat

रेल्वेचेही खासगीकरण ? 'या' मार्गावर धावणार देशातील पहिली खासगी रेल्वे

author img

By

Published : Jul 9, 2019, 1:23 PM IST

रेल्वेच्या खासगीकरणाला संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही रेल्वेने १०० दिवसीय मोहीम या कार्यक्रमांतर्गत दोन रेल्वे खासगी क्षेत्राला देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रेल्वे

लखनौ - बहुतांश सर्वच क्षेत्रात खासगीकरण होत असताना रेल्वे सेवा अजूनही संपूर्णपणे सरकारी अधिपत्याखाली आहे. मात्र लखनौ ते दिल्लीदरम्यानची तेजस एक्स्प्रेस सरकार खासगी कंपनीला चालविण्यासाठी देणार आहे. ही देशातील पहिली खासगी रेल्वे असणार आहे.

रेल्वेच्या खासगीकरणाला काही संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही रेल्वेने १०० दिवसीय मोहीम या कार्यक्रमांतर्गत दोन रेल्वे खासगी क्षेत्राला देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली-लखनौ या तेजस एक्स्प्रेस रेल्वेची २०१६ मध्ये घोषणा करण्यात आली होती. या रेल्वेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

असे असणार रेल्वेचे वेळापत्रक -
तेजस एक्स्प्रेस (रेल्वे क्रमांक १२५८५) ही लखनौच्या रेल्वे स्टेशनमधून सकाळी ६ वाजून ५० मिनिटाला सुटणार आहे. तर नवी दिल्लीला दुपारी १.३५ मिनिटाला पोहोचणार आहे. परतीच्या मार्गावर (रेल्वे क्रमांक १२५८६ ) ही नवी दिल्लीहून दुपारी ३.३५ ला सुटणार आहे. तर लखनौला रात्री १० वाजून ५ मिनिटाला पोहोचणार आहे. ही रेल्वे रविवार आणि गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी धावणार आहे. ही रेल्वे सध्या आनंदनगर रेल्वे स्थानकात आहे. ती खुल्या निविदेच्या प्रक्रियेनंतर खासगी कंपनीकडे देण्यात येणार आहे.

रेल्वेचा ताबा हा इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिंझग कॉर्पोरेशनकडे (आयआरटीसी) असणार आहे. यामध्ये भाड्याचे पैसे घेणे इत्यादी कामे आयआरएफसीकडे असणार आहेत.
दोन रेल्वे प्रायोगिकतत्वावर खासगी क्षेत्राला देणार आहेत. ही प्रक्रिया १०० दिवसांत सुरू होणार आहे. जास्तीत जास्त वाहतूक असले आणि महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडण्यात येतील असा रेल्वे मार्ग निवडण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रस्तावाला रेल्वे कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. देशात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याचा संघटनांनी इशारा दिला आहे.

अशी असेल सुविधा-
तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी खास सुविधा असणार आहेत. रेल्वेमध्ये एलसीडी एंटरटेनमेंट, माहिती देणारे स्क्रीन्स, वायफाय सुविधा, आरामदायी आसन व्यवस्था असणार आहे. याशिवाय वाचनासाठी वैयक्तिक लाईट सुविधा, मॉड्युलर बायोटॉयलेट्स आणि सेन्सरवर चालणारी नळ सुविधा असणार आहेत.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.