ऋषिकेश – टिहरीचे रहिवाशी कमलेश भट्ट यांच्या मृतदेहावर ऋषिकेश येथील पूर्णानंद घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री उशिरा कमलेशचा मृतदेह अबुधाबीहून दिल्लीत आणण्यात आला होता. तेथून रुग्णवाहिकेतून कमलेशचा मृतदेह ऋषिकेश येथे आणण्यात आला.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कमलेशच्या अंतिम संस्कारासाठी प्रशासनाने केवळ ८ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. यावेळी कमलेशचे वडील, भावासह अन्य ६ लोक उपस्थित होते.
कमलेशचा ह्रदयविकाराच्या झटक्याने १६ एप्रिल रोजी अबुधाबीत मृत्यू झाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह भारतात आणण्याची मागणी केली होती.
कमलेशचा मृत्यू ते अंत्यसंस्कार असा होता घटनाक्रम
- 16 एप्रिल रोजी कमलेश भट्टचा अबु धाबीत मृत्यृ.
- नातेवाईकांच्या प्रयत्नानंतर गुरुवारी (23एप्रिल) रात्री कमलेशचा मृतदेह भारतात आणला गेला.
- कमलेशचे नातवाईक दिल्लीत पोहोचले परंतु अधिकाऱ्याने काही तांत्रिक अडचणींमुळे कमलेशचा मृतदेह अबुधाबीला परत पाठवला.
- त्यानंतर कमलेशचे नातेवाईक २४ एप्रिलला गावात परत आले.
- ईटीव्ही भारतने या कुटूंबाचे दु:ख समजून घेत याचे वृत्त प्रसिद्ध केले.
- ईटीव्हीने सर्वप्रथम सीएमचे माध्यम सल्लागार रमेश भट्ट व मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांच्याशी बातचीत केली.
- त्यानंतर टिहरीचे जिल्हाधिकारी व्ही. षणमुगम यांना घटना सांगितली.
- प्रशासनाने कार्यवाही सुरू करण्यापूर्वी आमचे ब्यूरो हेड किरनकांत शर्मा यांनी दुबईत रहात असलेले अनिवासी भारतीय व सामाजिक कार्यकर्ते गिरीश पंत त्याचबरोबर रोशन रतूड़ी यांच्याशी बातचीत केली..
- त्यांनी अबु धाबी स्थित इंडियन अँबेसीतील पासपोर्ट विभागात कार्यरत काउंसलेट के. सुरेश यांच्याशी संवाद साधला.
- के. सुरेश यांनी सांगितले, की कमलेशचा मृतदेह भारतात पाठवण्यात आला मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी मृतदेह नातवाईकांना सोपविण्यात आला नाही.
- त्यानंतर अबु धाबी स्थित भारतीय दुतावासाशी पुन्हा संपर्क साधला गेला.
- फ्री अप्रूव्हलसाठी भारत सरकारकडून पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर एनओसी मिळताच मृतदेह भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.
- रविवारी रात्री उशिरा कमलेशचा मृतदेह भारतात दाखल झाला.