ETV Bharat / bharat

मागास विद्यार्थिनीने वाढलेले जेवण खाण्यास शिक्षिकेचा नकार; स्पर्श केलेल्या ताटाला केली खूण - छुआछूत

एकीकडे पंतप्रधान मोदी वंचित समाजातील सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतात. तर, देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद मागास समाजातून येतात. तरीही २१व्या शतकात देशातून जातीय भेदभाव संपलेला नाही. याची ही घटना प्रचिती देते.

शाळेचे छायाचित्र
author img

By

Published : Apr 13, 2019, 11:09 AM IST

Updated : Apr 13, 2019, 12:01 PM IST

रायपूर (छत्तीसगड)- मागास समाजाच्या एका विद्यार्थीनीने वाढलेले जेवण खाण्यास शिक्षिकेने नकार दिला. एवढेच नाही तर विद्यार्थिनेने शिवलेल्या त्या ताटाची आठवण रहावी म्हणून ताटालाही खूण करुन ठेवण्यास सांगितले. शासकीय पूर्व माध्यमिक विद्यालय सूरजपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

पीडित विद्यार्थिनी ८व्या वर्गात शिकते. ९ एप्रिलला मध्यान्ह भोजन करताना काही शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थीनींना भोजन वाढण्याचे सांगितले होते. त्यावेळी पीडितेने सूरजमणी कुशवाहा या शिक्षिकेला ते भोजन दिले. त्यावेळी त्या शिक्षिकेने ही विद्यार्थीनी हरिजन आहे हिच्या हातचे जेवण आपण खाणार नाही, असे म्हटले. तर, वाढलेले ते ताट परत नेण्यास पीडितेला सांगितले.

पहा पीडितेचे आणि शिक्षकाचे काय म्हणणे आहे

या प्रकरणीची हद्द तर तेव्हा झाली जेव्हा त्या पीडित विद्यार्थीनीने वाढलेल्या ताटालाच शिक्षिकेने खूण करण्यास सांगितले. या घटनेनंतर विद्यार्थिनी अत्यंत दुखी झाली. या संपूर्ण घटनेची माहिती पालकांना दिल्यानंतर तिने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. तसेच लिखीत स्वरुपात तक्रार नोंदवून शिक्षिकेवर योग्य ती कारवायी करण्याची मागणी केली आहे. तर, त्या शाळेत आपल्याला शिकायचे नाही, अशी इच्छाही जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर, शाळेतील काही शिक्षकांनीही आरोपी शिक्षिकेची वागणूक चांगली नसल्याचे म्हटले आहे. त्या शिक्षिका उच्च समाजातून येतात म्हणून आम्ही त्यांचा विरोधही करु शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

एकीकडे पंतप्रधान मोदी वंचित समाजातील सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतात. तर, देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद मागास समाजातून येतात. मात्र, असे असतानाही या समाजाची स्थिती सुधारल्याचे दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

Intro:छुआछूत दलित छात्रा के हाथ का खाना खाने से इंकार किया शिक्षिका ने कलेक्टर से की शिकायत

Body:सूरजपुर जहां एक ओऱ देश के प्रधानमंत्री स्वच्छता पैर धोकर छुआछूत और ऊंच नीच का भेदभाव खत्म करने का संदेश दे रहे हैं वहीं दूसरी ओर जिले के एक स्कूल में शिक्षिका द्वारा छुआछूत को बढ़ावा देते हुए दलित समुदाय की बच्चियों को बेइज्जत और प्रताड़ित किया जा रहा है शिक्षिका के बर्ताव से व्यथित छात्रा ने जिला के कलेक्टर से इसकी शिकायत की दरअसल सूरजपुर जिले के ग्राम नेवरा की दलित समुदाय की बेटी ग्राम पसला के पूर्व माध्यमिक शाला में कक्षा आठवीं में अध्ययनरत है यहां 9 अप्रैल को जब मैं मध्यान भोजन के तहत आकाश था उच्च विद्यालय की कुछ शिक्षिकाओं ने छात्राओं से भोजन लाने के लिए कहा तो उनमें से एक दलित छात्रा ने जब यहां पदस्थ शिक्षिका सूरज मणि कुशवाहा को भोजन ला कर दिया तो वह नाराज हो गई कहने लगी कि यह छात्रा तो हरिजन है इसके हाथ का खाना नहीं खाऊंगी और यह करते हुए उसी थाली वापस भेज दी इतना ही नहीं उस थाली में निशान लगाने के लिए भी निर्देश दिया ताकि यह पता चले की इस थाली को किसी दलित समुदाय की बेटी ने स्पर्श कर दिया है शिक्षिका के इस बर्ताव से दुखी और व्यथित छात्रा ने जहां एक ओर कलेक्टर से मुलाकात कर लिखित आवेदन के माध्यम से पूरे घटना से अवगत कराया वहीं दूसरी ओर छात्रा ने उच्च विद्यालय से नाम कटा कर अन्य संस्था में पढ़ने की इच्छा जताई है गौरतलब है कि जिले मैं कुछ संस्थानों पर आज भी छुआछूत के प्रति भेदभाव पूर्ण रवैया देखने को मिल रहा है कलेक्टर ने मामले को संज्ञान में लेते हुए जांच के आदेश दे दिए हैं इस संबंध में जिला कलेक्टर दीपक सोनी ने बताया कि छात्रा के द्वारा इस आशय पत्र पर जिला शिक्षा अधिकारी को जांच की आदेश दे दी गई है वहीं स्कूल के प्रधाना पाठक ने कहां की इस शिक्षिका का रवैया ठीक नहीं है य आए दिन इस तरह की घटना कार्य करती है चुकी है एक दबंग महिला है जिसके कारण हम लोग भी इसका विरोध नहीं कर सकते हैं

बाईट - पीड़ित छात्रा
बाईट - प्रधान पाठक,,, पसला स्कूल

अख्तर अली ईटीवी भारत सूरजपुर

Conclusion:
Last Updated : Apr 13, 2019, 12:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.