अमरावती (आंध्रप्रदेश) - राज्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी काळजी घेण्यासाठीचे पत्र माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी डीजीपी दामोदर गौतम सवंग यांना लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी लिहिले आहे, की आंध्रप्रदेशमध्ये काही गुन्हेगार दंगे घडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच नाकरेकल येथील आदिवासी महिलेच्या हत्या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या तसेच वेलिगोडी मंडलमध्ये झालेल्या दुसऱ्या महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा द्या, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.