शिमोगा (कर्नाटक) - हिप्पोपोटॅमसच्या दातांची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीला शिमोगा जिल्हा वनविभागाने अटक केली आहे. वन पथकाने यापूर्वी सोराबा तालुक्यात हिप्पोपोटॅमसवर हल्ला करताना तिघांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत इतर दोघेही या प्रकरणात सहभागी असल्याचे तपासात समोर आले होते.
हिप्पोपोटॅमसचे दात हे टांझानियावरून गोव्यात आयात केले होते. एक दाम्पत्य १९६० मध्ये टांझानियाहून गोव्यात राहायला आले होते. त्यांच्या घरातून हे दात सापडल्याची माहिती मिळाली आहे. तेथून हे दात एका वाहनाने गोवा-कर्नाटक सीमेवर आणण्यात आले. त्यानंतर विशाल आणि अनिल नावाच्या दोन व्यक्तींनी हे हिप्पोपोटॅमसचे दात भटकल येथील मोहम्मद दानिश, होन्नावार येथील मुझफ्फर आणि सोरबा येथील झाकीर या तिघांना दिले. त्यांना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ वनअधिकारी रवी शंकर यांनी दिली.
दरम्यान, या सर्व आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गस्तीवर असणारे बाळचंद्र होशल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागातील ११ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीमने या सर्व दोषींना अटक केली. या आरोपींकडून दातांशिवाय ४ वाहने आणि पैसे मोजण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे.