ETV Bharat / bharat

दिवसभरात तामिळनाडूत 54 तर पंजाबमध्ये 26 नवे कोरोनाग्रस्त

तामिळनाडू राज्यात एकून रुग्ण संख्या 1 हजार 683 झाल्या आहेत. यातील 908 अ‌ॅक्टिव्ह केसेस असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 23, 2020, 7:15 PM IST

नवी दिल्ली - आज(गुरुवार) दिवसभरात तामिळानाडू राज्यामध्ये 54 तर पंजाबमध्ये 26 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर केरळराज्यात 10 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

तामिळनाडू राज्यात एकून रुग्ण संख्या 1 हजार 683 झाल्या आहेत. यातील 908 अ‌ॅक्टिव्ह केसेस असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. तर पंजाब राज्यामध्ये 283 रुग्णसंख्या झाली आहे. केरळमधील परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. राज्यामध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 447 झाली असून फक्त 129 अ‌ॅक्टिव्ह केसेस(संक्रमित) आहेत.

मागील 28 दिवसांपासून 12 जिल्ह्यामधून एकही कोरोनाची नवी केस समोर आली नाही. तर 78 जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर 19 टक्के आहे, असे अगवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. त्यामुळे देशातील परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.