चेन्नई - तामिळनाडूमधील कोईंबतूरच्या एका खासगी कंपनीने कमी दरातील व्हेंटिलेटर्स बनवले आहेत. या व्हेंटिलेटर्सची किंमत अवघी २५ हजार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
'अटल इनक्युबेशन सेंटर' असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीला केंद्र सरकारने अनुदानही दिले आहे. त्यांनी ज्या प्रकारचे व्हेंटिलेटर बनवले आहे, त्याची बाजारातील किंमत सुमारे अडीच लाख आहे. मात्र या कंपनीने हे व्हेंटिलेटर केवळ २५ हजार रुपयांमध्ये बनवल्याचा दावा केला आहे. आयपीपीबीव्ही (इंटरमिटन्ट पॉझिटिव्ह प्रेशर ब्रीदिंग व्हेंटिलेटर) असे या व्हेंटिलेटरचे नाव आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत काही रुग्णालयांमध्ये याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. तसेच, त्यांनी आता याच्या चाचणीसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडेही अर्ज केला आहे. परिषदेकडून परवानगी मिळताच याचे मोठ्या स्तरावर उत्पादन घेण्याचा कंपनीचा मानस आहे.
हेही वाचा : कोरोना विरोधी 40 पेक्षा जास्त लसींचं काम प्रगतीपथावर, मात्र...