ETV Bharat / bharat

सोने तस्करीतील स्वप्ना सुरेशचे दुबईमधील दुतावासात जवळचे संबंध - एनआयएचा दावा - Swapna Suresh

एनआयएने स्वप्ना सुरेशच्या जामिनाला विरोध केला आहे. तिचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे कार्याल आणि दुबईच्या दुतावासात जवळचे संबंध आहेत. त्या संबंधाचा आरोपीने खूप गैरफायदा घेतल्याचा एनआयएने दावा केला आहे.

संपादित
संपादित
author img

By

Published : Aug 6, 2020, 2:43 PM IST

कोची (तिरुवनंतपुरम) – केरळमधील सोने तस्करीप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या स्वप्ना सुरेशच्या जामिनाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विरोध केला आहे. तिचे दुबईमधील दुतावासामध्ये जवळचे संबध होते, असे एनआयएने जामिनाला विरोध करताना म्हटले आहे.

स्वप्ना सुरेश हिने जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. सोने तस्करीचे संवेदनशील गुन्हे प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून केला जात आहे. या तपास संस्थेने स्वप्ना सुरेशच्या जामिनाला विरोध केला आहे. तिचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे कार्याल आणि दुबईच्या दुतावासात जवळचे संबंध आहेत. त्या संबंधाचा आरोपीने खूप गैरफायदा घेतल्याचा एनआयएने दावा केला आहे.

दुबई दुतावासातून नोकरी सोडल्यानंतर तिला दर महिन्याला 1 हजार डॉलरचे वेतन देण्यात येते. यावरून तिचे दुबईमधील दुतावासात जवळचे संबंध असल्याचे दिसून येते, असे तपास संस्थेने म्हटले आहे.

काय आहे सोने तस्करीचे प्रकरण?

तामिळनाडू विमानतळावर डिप्लोमॅटिक बॅगेज यंत्रणेद्वारे सोन्याची तस्करी करण्यात आली होती, या प्रकरणी तपास करणाऱ्या राष्ट्रीय अन्वेषण विभागाने स्वप्ना सुरेश यांच्या नावे असलेल्या दोन बँकेतील लॉकर्समधून 1 किलो सोने आणि 1 कोटी रुपये जप्त केले आहेत.

न्यायालयाला दिलेल्या अहवालानुसार, एनआयएने स्वप्नाच्या नावे फेडरल बँकेच्या तिरुवनंतपुरम शाखेतील लॉकरमधून 36.5 लाख रुपये जप्त केले आहेत. तर स्वप्नाच्या नावे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया येथील तिरुवनंतपुरम शाखेतील लॉकरमधून 64 लाख रुपये रोकड आणि 982.5 किलो सोन्याचे आभूषण जप्त केले आहेत. न्यायालयाने आरोपी स्वप्ना सुरेश व संदीप नाय्यर यांना 21 ऑगस्टपर्यंत न्यायिक कोठडी सुनावली आहे. दोघांनाही एर्नाकुलमच्या कक्कानाड येथील जिल्हा तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.