ETV Bharat / bharat

‘दीदीं’ना हादरा; तृणमूलच्या बड्या नेत्याने दिला आमदारकीचा राजीनामा - तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी लेटेस्ट न्यूज

तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सुवेंदू यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे भाजप नेत्यांनी म्हटल्याने राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत.

सुवेंदू अधिकारी
सुवेंदू अधिकारी
author img

By

Published : Dec 16, 2020, 5:31 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानं बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुवेंदू यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे भाजप नेत्यांनी म्हटल्याने तर्क-वितर्क लावले जात आहेत. ते भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अधिकारी कुटुंबाचा राजकीय दबदबा -

सुवेंदू अधिकारी हे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शिशिर अधिकारी यांचे थोरले पुत्र आहेत. सुवेंदू अधिकारी यांचे वडिल आणि भाऊ दोघेही खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून तृणमूल काँग्रेसने पश्चिम मिदनापूर आणि झारग्राम या दोन जिल्ह्यांमध्ये यापूर्वी आपली पकड गमावली आहे. अधिकारी यांनी पक्ष सोडल्यास पूर्व मिदनापूरमध्ये पक्षाची स्थितीही खालावू शकते. भाजप याकडे एक संधी म्हणून पाहत आहे. सुवेंदू अधिकारीचा भाऊ दिव्येंदू अधिकारी पूर्व मिदनापूरमधील तामलूक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

तृणमूलचे भविष्य अंधकारमय -

सुवेंदू यांनी पक्ष सोडल्यानंतर वडील आणि दोन भावांनी त्याच मार्गाचा अवलंब केल्यास 16 व्या विधानसभा मतदारसंघात तृणमूलचे भविष्य अंधकारमय होईल. कारण, जिल्ह्यातील मतदारांच्या मोठ्या भागावर अधिकारी परिवाराचा प्रभाव अजूनही कायम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे झाल्यास नंदीग्राममधील तृणमूल कॉंग्रेसची पाळेमुळे हादरली जातील.

भाजपाचे ध्येय -

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. अमित शहा यांनी मिशन बंगालचे लक्ष्य निश्चित केले. ममता बॅनर्जीही यावेळी भाजपाला गांभीर्याने घेत आहेत. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करा - सर्वोच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.