ETV Bharat / bharat

सुषमा विरुद्ध सोनिया....बेल्लारीची लोकसभा निवडणूक अन् स्वराज यांची 'ती' गाजलेली प्रतिज्ञा - सोनिया गांधी विरुद्ध सुषमा स्वराज

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. सुषमा स्वराज यांना रात्री एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

सुषमा विरुद्ध सोनिया
author img

By

Published : Aug 7, 2019, 9:57 AM IST

नवी दिल्ली - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. सुषमा स्वराज यांना रात्री एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती.

सोनिया गांधी विरुद्ध सुषमा स्वराज

सुषमा स्वराज आणि सोनिया गांधी यांच्यातील कटुता अगदी सुरुवातीपासूनच आहे. 1999 मध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटकच्या बेल्लारी आणि उत्तरप्रदेशच्या अमेठी या दोन मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी भाजपने बेल्लारीमध्ये सोनिया गांधी यांच्याविरुद्ध सुषमा स्वराज यांना रणांगणात उतरवले होते. भाजपने परदेशी सून आणि भारताची मुलगी अशी प्रचाराची रणनिती आखली होती. यावेळी प्रचारातही सुषमा यांनी कन्नडीमध्ये भाषणे केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे देखील बेल्लारीत सुषमा स्वराज यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले होते. तरीही सुषमा स्वराज यांना याठिकाणी पराभव पत्करावा लागला होता.

....तर मुंडण करेल

बेल्लारीतील पराभवानंतर सुषमा व सोनिया यांच्यातील वाद कायमच उघडपणे दिसत होते. जेव्हा 2004 मध्ये काँग्रेसने लोकसभेत बहुमत मिळवल्यानंतर सोनिया गांधी जर पंतप्रधान झाल्या तर, मी मुंडण करेल व जमिनीवर झोपेल, असा इशारा सुषमा स्वराज यांनी दिला होता. त्यावेळी सोनिया गांधी यांनी स्वत: पंतप्रधान न होण्याची इच्छा व्यक्त केली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.