ETV Bharat / bharat

सुषमा स्वराज यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी - माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज

माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले

सुषमा स्वराज
author img

By

Published : Aug 6, 2019, 11:38 PM IST

Updated : Aug 6, 2019, 11:48 PM IST

दिल्ली - माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्या दिवसांपासून आजारी होत्या.

  • सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व. त्यांचा जन्म - 14 फेब्रुवारी 1952 ला अंबाळा येथे झाला. त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली होती.
  • कपाळावरील मोठी लाल टिकली, भांगामध्ये सिंदूर, मोठ्या काठांची कॉटनची साडी आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ही सुषमा स्वराज यांची ओळख होती.
  • आपल्या वक्तृत्वाने सुषमा स्वराज यांनी भाजपचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर पोहोचवला.
  • सुषमा स्वराज यांनी 1977 ते 82 आणि 1987 ते 90 सालापर्यंत हरियाणा विधानसभेच्या आमदार म्हणून काम केले.
  • 1977-79 दरम्यान सुषमांनी हरियाणा सरकारमध्ये विविध मंत्रीपदे सांभाळली.
  • 1990 मध्ये सुषमा स्वराज यांची पहिल्यांदा राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठीही त्या उमेदवार होत्या.
  • 1996 मध्ये सुषमा स्वराज पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या. 11 व्या लोकसभा निवडणुकीत 16 मे -1 जुन 1996 दरम्यान त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले.
  • 1999 मध्ये कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघातून त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात निवडणुकीत उभ्या राहिल्या. ही निवडणूक त्या हरल्या. त्यानंतर 2004 मध्ये जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसने पुढे आणले तेव्हा सुषमा स्वराज यांनी त्याचा खूप विरोध केला.
  • 2009 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या जागी त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळले.
  • लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनाही पंतप्रधानपदाचं स्वप्न पडलेच. सुरुवातीला त्यांनीही पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाचा विरोध केल्याचीही चर्चा आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 6, 2019, 11:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.